सलमान खानचा बिग बॉस १९च्या प्रीमियर या दिवशी येणार भेटीला? कंटेस्टंट्सची नाव आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:56 IST2025-06-24T15:49:10+5:302025-06-24T15:56:55+5:30
Bigg Boss 19 : सलमान खानचा शो बिग बॉस १९ लवकरच प्रीमियर होणार आहे. प्रीमियरच्या तारखेसोबतच शोची थीम आणि स्पर्धकांची नावे देखील समोर आली आहेत.

सलमान खानचा बिग बॉस १९च्या प्रीमियर या दिवशी येणार भेटीला? कंटेस्टंट्सची नाव आली समोर
दरवर्षी सलमान खान(Salman Khan)च्या बिग बॉस शोबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ असते. आतापर्यंत या शोचे १८ सीझन प्रदर्शित झाले आहेत. आता लवकरच बिग बॉस १९ (Bigg Boss 19) छोट्या पडद्यावर येणार आहे. असे म्हटले जात आहे की बिग बॉस १९ हा शो बऱ्याच काळापासून टीव्हीवर दाखवला जाईल. अनेक वृत्तांतांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की यावेळी बिग बॉस १९ चा प्रीमियर १९ जुलै रोजी होईल. लेटेस्ट वृत्तानुसार, बिग बॉस १९ चा प्रीमियर ३ ऑगस्टपासून होईल. मात्र, शोच्या प्रीमियर तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
रिपोर्टमध्ये असे म्हटले जात आहे की, बिग बॉस १९ चा कार्यक्रम थोडा जास्त काळ चालणार आहे. असा दावाही केला जात आहे की यावेळी कोणताही इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर्स शोचा भाग असणार नाहीत. टेली चक्करच्या रिपोर्टनुसार, बिग बॉस १९ प्रेक्षकांसमोर जुन्या थीमसह सादर केला जाईल. असे म्हटले जात आहे की यावेळी शोमध्ये एक सीक्रेट खोली असेल, जिथे नामांकित स्पर्धकाला ठेवले जाईल. तिथून ते बिग बॉसच्या घरात उपस्थित असलेल्या स्पर्धकांना पाहतील. रिपोर्टमध्ये असे म्हटले जात आहे की यावेळी एविक्शन देखील प्रेक्षक मतदानाद्वारे केले जाईल. कोणतेही टास्कवर आधारीत एविक्शन होणार नाही.
स्पर्धकांची यादी
टास्कद्वारे, स्पर्धकांना फक्त घरातील किराणा सामान दिले जाईल. शोच्या स्पर्धकांची नावे देखील उघड झाली आहेत. या यादीत डेझी शाह, तनुश्री दत्ता, फैजल शेख उर्फ फैजू, खुशी दुबे, विक्रम सिंह चौहान, राम कपूर, शशांक व्यास आणि लक्ष्य चौधरी यांचा समावेश आहे. मात्र या स्पर्धकांच्या नावांना अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही.