​सलमान खानच्या या लाडक्या मित्राच्या विरोधात दाखल करण्यात आला गुन्हा... प्रेयसीला केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 11:26 IST2018-06-05T05:56:58+5:302018-06-05T11:26:58+5:30

अरमान कोहली आपल्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाला होता. अरमानने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटात काम केले आहे. पण त्याचा ...

Salman Khan's friend has filed a crime against him ... | ​सलमान खानच्या या लाडक्या मित्राच्या विरोधात दाखल करण्यात आला गुन्हा... प्रेयसीला केली बेदम मारहाण

​सलमान खानच्या या लाडक्या मित्राच्या विरोधात दाखल करण्यात आला गुन्हा... प्रेयसीला केली बेदम मारहाण

मान कोहली आपल्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाला होता. अरमानने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटात काम केले आहे. पण त्याचा कोणताच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही. त्याने काही वर्षांपूर्वी प्रेम रतन धन पायो या चित्रपटात काम केले होते. पण त्याच्या अभिनयाची तितकीशी चर्चा झाली नाही. अरमान हा सर्वात जास्त प्रसिद्ध बिग बॉस या कार्यक्रमामुळेच झाला. बिग बॉसच्या घरात असताना सगळ्यांशी भांडणे, सगळ्यांवर उगाचच ओरडणे, स्वतःच्या रागावर नियंत्रण नसणे या सगळ्या गोष्टींमुळे तो प्रचंड फेमस झाला होता. या घरात असताना अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जी सोबत त्याचे प्रेमप्रकरण सुरू झाले होते आणि त्या दोघांचे प्रेमप्रकरण चांगले गाजले देखील होते. ते दोघे लग्न करणार असे वाटत असताना त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.
अरमान कोहली हा अभिनेता सलमान खानचा खूप जवळचा मित्र आहे. त्याच्यामुळेच अरमानला बॉलिवूडमध्ये काम मिळते असे देखील म्हटले जाते. तनिषासोबत ब्रेकअप झाल्यानंतर नीरू रंधावा त्याच्या आयुष्यात आली. अरमान आणि नीरूचे प्रेमप्रकरण गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. पण नीरूने आता अरमानच्या विरोधात सांताक्रूज पोलिस स्टेशनमध्ये केस दाखल केली आहे. सांताक्रूझमधील अरमानच्या घरी त्याने रविवारी दुपारी रागाच्या भरात नीरूला मारहाण केली असल्याची तक्रार तिने नोंदवली आहे. पैशांवरून त्या दोघांमध्ये वाद झाली असल्याची चर्चा आहे. नीरूच्या डोक्याला, गुडघ्याला चांगलीच दुखापत झाली आहे. तिला कोकिळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर रुग्णालयाने पोलिसांना याबाबत कळवले. 
याआधी अरमान आणि तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मुनमुन दत्तासोबत नात्यात होता. अरमान आणि मुनमुन यांचे प्रेमप्रकरण २००८ साली सुरू झाले होते. पण काहीच काळात त्यांचे ब्रेक अप झाले. अरमानच्या रागीट स्वभावामुळे मुनमुनने त्याच्यासोबत ब्रेक अप करण्याचा निर्णय घेतला होता. अरमानने अनेकवेळा रागाच्या भरात मुनमुनवर हात उचलला असल्याचे देखील म्हटले जाते. 

armaan kohli and neeru randhawa

Also Read : बिग बॉसमधील या प्रेमकथांचे काय झाले?

Web Title: Salman Khan's friend has filed a crime against him ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.