सलमान खानच्या 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व रद्द, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 10:38 AM2024-04-14T10:38:08+5:302024-04-14T10:38:51+5:30

'बिग बॉस ओटीटी 3' बद्दल मोठं अपडेट आलं आहे.

Salman Khan's 'Bigg Boss OTT' season 3 cancelled, know the reason | सलमान खानच्या 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व रद्द, जाणून घ्या कारण

सलमान खानच्या 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व रद्द, जाणून घ्या कारण

सलमान खानचा सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस'चा प्रत्येक सीझन लोकांना आवडतो. टीव्हीवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केल्यानंतर  बिग बॉस ओटीटीवरही सुरू झाला . आतापर्यंत 'बिग बॉस ओटीटी'चे दोन सीझन आले आहेत. आता बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीझन कधी येतोय याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.  यातच आता 'बिग बॉस ओटीटी 3' बद्दल मोठं अपडेट आलं आहे. 

येत्या १५ मेपासून 'बिग बॉस ओटीटी' तिसरं पर्व सुरू होणार असल्याचं म्हटलं जातं होतं.  पण, यातच आता 'बिग बॉस ओटीटी 3' ची वाट पाहणाऱ्या चाहत्यांची निराशा होणार आहे. कारण, सलमान खानच्या 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व रद्द करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्याचं बोललं जात आहे. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार 'बिग बॉस ओटीटी 3' रद्द करण्यात आला आहे. 

 कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमाने यावेळी 'बिग बॉस ओटीटीचा सीझन 3' न आणण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बॉसच्या सर्व चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे. निर्मात्यांनी जर 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व मे महिन्यात सुरु केलं तर त्यानंतर ऑक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या 'बिग बॉस 18'मध्ये जास्त अंतर राहणार नाही.   त्यामुळे निर्मात्यांनी ओटीटी सीझन 3 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शो रद्द झाल्याच्या वृत्ताला निर्मात्यांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

दिव्या अग्रवालने बिग बॉस ओटीटीचा पहिला सीझन जिंकला आणि एल्विश यादवने बिग बॉस ओटीटी 2 जिंकला. 'बिग बॉस 17' जानेवारीमध्ये संपला आणि चाहते 'बिग बॉस ओटीटी 3' ची आतुरतेने वाट पाहत होते. आता चाहत्यांना ऑक्टोबरपासून टेलिव्हिजनवर सुरू होणाऱ्या 'बिग बॉस 18' ची सर्वांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Salman Khan's 'Bigg Boss OTT' season 3 cancelled, know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.