सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:54 IST2025-06-18T15:54:15+5:302025-06-18T15:54:58+5:30

आमिर सध्या तिसऱ्या गर्लफ्रेंडसोबत आहे याबद्दल विचारल्यावर सलमानने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

salman khan made fun of aamir khan over his past marriages and new girlfriend | सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."

सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."

कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Great Indian Kapil Show) सीझन ३ लवकरच येत आहे. यावेळी भाईजान सलमान खान (Salman Khan) पहिला पाहुणा असणार आहे. या एपिसोडचा टीझर नुकताच रिलीज झाला. नेहमीप्रमाणे कपिल शर्मा त्याच्या स्टाईलमध्ये मस्ती करताना दिसतोय. तर सलमानचाही सेन्स ऑफ ह्युमर काही कमी नाही. यावेळी कपिलने सलमानसमोर आमिर खानचाही विषय काढला. आमिर सध्या तिसऱ्या गर्लफ्रेंडसोबत आहे याबद्दल विचारल्यावर सलमाननेही मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा'शोच्या तिसऱ्या सीझनला लवकरच सुरुवात होत आहे. 'सिकंदर'सलमान खान शोमध्ये पहिला पाहुणा आहे. या एपिसोडचा प्रोमो नुकताच आला. बॉलिवूडच्या भाईजानने त्याचा स्वॅग दाखवत सेटवर एन्ट्री घेतली. सुरुवातीला त्याने नेटफ्लिक्सवरच जोक केला. सलमान म्हणाला, "आधी मी या शोचा निर्माता होतो. नेटफ्लिक्सने शो घेतला आणि आज मलाच पाहुणा म्हणून बोलवलं. काय कमाल पॉवर आहे." नंतर कपिल शर्मा आमिरचं नाव घेत म्हणाला, "तिकडे आमिर थांबतच नाहीए आणि इकडे तुम्ही करतच नाहीए." कपिलच्या या मजेशीर प्रश्नावर सलमानही हसत म्हणाला, "आमिरची गोष्टच निराळी आहे. तो परफेक्शनिस्ट आहे. जोपर्यंत तो लग्नात परफेक्ट होत नाही तोवर..." वाक्य पूर्ण करण्याआधीच सलमानची हसून हसून पुरेवाट झाली. यावर कपिल आणि प्रेक्षकही खळखळून हसले. तसंच सलमान स्वत:च्याच 'सिकंदर' सिनेमाची खिल्लीही उडवताना दिसतो.

प्रोमोच्या शेवटी कृष्णा अभिषेक आणि सुनील ग्रोवर शाहरुख आणि सलमान बनून येतात. खऱ्या सलमानला समोर पाहून सुनील कृष्णाला म्हणतो, 'मला वाटतं आज आपण राहु द्यावं'. 

प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट करत सलमानच्या लूक्सचं कौतुक केलं आहे. 'समलान पुन्हा तरुण दिसत आहे' अशा कमेंट्स आल्या आहेत. तसंच सिद्धू पाजींची शायरी ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: salman khan made fun of aamir khan over his past marriages and new girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.