'बिग बॉस शो'मधल्या जल्लादवर ओढावले आर्थिक संकट, दोन वेळच्या जेवणासाठी करावा लागतोय संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 14:38 IST2021-07-10T14:31:59+5:302021-07-10T14:38:15+5:30

बिग बॉस शोमधला जल्लाद म्हणजे बाबा खान यांना कधी काम मिळेल याच्याच ते शोधात आहे.आर्थिक तंगीमुळे दोन वेळेच्या जेवणाचीही सोय होईल की नाही याचीच चिंता आता त्यांना सतावत आहे.

Salman Khan 'Bigg Boss' fame Baba Khan aka Jallad Due To Financial Crisis Appeals For Work | 'बिग बॉस शो'मधल्या जल्लादवर ओढावले आर्थिक संकट, दोन वेळच्या जेवणासाठी करावा लागतोय संघर्ष

'बिग बॉस शो'मधल्या जल्लादवर ओढावले आर्थिक संकट, दोन वेळच्या जेवणासाठी करावा लागतोय संघर्ष

टीव्हीवरचा सगळ्यात वादग्रस्त शो 'बिग बॉस' मध्ये एका व्यक्तीने चांगलेच लक्ष वेधून घेतले होते. सलमान खाननही या व्यक्तीला स्टेजवर बोलावण्यासाठी खूप उत्सुक असायचा तो व्यक्ती होता शोमधला जल्लाद म्हणजेच बाबा खान. बिग बॉस शोमुळे तो प्रचंड चर्चेत असायचा. मात्र लॉकडाऊनचा त्यालाही प्रचंड त्रास झाला आहे. कोरोनामुळे त्याच्यावरही बेरोजगारीचे संकट ओढावले आहे.  कधी काम मिळेल याच्याच तो शोधात आहे. आर्थिक तंगीमुळे दोन वेळेच्या जेवणाचीही सोय होईल की नाही याचीच चिंता आता त्यांना सतावत आहे. नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांची आपबीती बोलून दाखवली आहे.

आर्थिक अडचणीत सापडलेल्या बाबा खान यांना आता सलमान खानने त्यांना मदत करावी अशी ईच्छा बोलून दाखवली आहे. नुसते बिग बॉसच नाही तर बाबा खान यांनी सलमान खान, आमिर खान ,जॉन अब्राहम अशा बड्या बड्या कलाकारांसोबतही काम केले आहे. कोरोनामुळे मनोरंज इंडस्ट्रीलाही प्रचंड मोठे नुकसान झाले पण आता जास्त दिवस घरात बसू शकत नाही. त्यामुळे लवकरात लवकर काम मिळाले तर त्यांची आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होईल. दोन वेळच्या जेवणाची सोय होणंच सध्या महत्वाचे असल्याचे बाबा खान यांनी सांगितले आहे. 

बाबा खान भाड्याच्या घरात राहतात. ८ लोकांचे त्यांचे कुटुंब आहे. बाबा खान यांना कधी काम मिळेल याचीच प्रार्थना कुटुंबिय करत असतात. सलमान खानने त्यांना मदत म्हणून काम मिळवून द्यावी हीच त्यांची ईच्छा आहे. सलमान भाईवर मला पूर्ण विश्वास आहे. माझी व्यथा त्यांच्यापर्यंत पोहचताच तो माझी नक्कीच मदत करेल याचीही मला खात्री असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इंडस्ट्रीमधल्या मित्रांजवळ अडचण सांगतो तेव्हा मोठा आधार त्यांच्याकडून मिळतो. 

Web Title: Salman Khan 'Bigg Boss' fame Baba Khan aka Jallad Due To Financial Crisis Appeals For Work