सलमान खान 'बिग बॉस 12'च्या प्रोमोमध्ये दिसणार डॉशिंग अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 06:00 IST2018-08-14T16:50:43+5:302018-08-15T06:00:00+5:30

सलमान खान आता बिग बॉसच्या आगामी सीझनची थीम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Salman Khan appears in 'Bigg Boss 12' promo | सलमान खान 'बिग बॉस 12'च्या प्रोमोमध्ये दिसणार डॉशिंग अंदाजात

सलमान खान 'बिग बॉस 12'च्या प्रोमोमध्ये दिसणार डॉशिंग अंदाजात

ठळक मुद्देसेटवर त्याने प्रवेश केल्यापासून सेटवरील ऊर्जा वाढली आहे

या वर्षीच्या 'बिग बॉस12'ची थीम सर्वोच्च सुपरस्टार उघड करत असताना आपण छान प्रकटीकरणाची अपेक्षा करणारच. त्याच्या आवडीची, क्रिएटिव्ह इनपुटची, सुधारणांची आणि भव्यतेची कल्पना असल्यामुळे सलमान खान आता बिग बॉसच्या आगामी सीझनची थीम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

जोडी हा शब्द नेहमी पती-पत्नी, मुलगा-मुलगी इ. साठी वापरला जातो. तथापि, बिग बॉस 12 आता जोडीची संकल्पनाच बदलण्यासाठी सज्ज झाला आहे कारण त्याची थीमच आहे विचित्र जोड्या. तुम्ही एकटे जे काही करू शकत नाही उदाहरणार्थ सासू-सून, मामा-भाचा, मालक-नोकर, या जोड्या नक्कीच मनोरंजन करतील.  सलमान खान आता नवव्या वेळी बिग बॉसचे होस्टिंग करणार आहे, आणि त्याने नुकताच शोच्या प्रोमोच्या चित्रीकरणात भाग घेतल. प्रत्येक वर्षी सलमान खान शोचे सुकाणू हाती घेतो आणि त्याच्या स्वभाव, विनोद, दृष्टिकोन आणि त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वाने शोला एक नवीन आकार देतो. प्रोमोच्या चित्रीकरणाच्या वेळी सलमान खानने त्याच्या लोकप्रिय सिनेमातील काही शैलीदार नृत्याच्या चाली त्यात समाविष्ट केल्या. जेव्हा कॅमेरे फिरत होते तेव्हा सलमानने त्याच्या प्रसिध्द जवानी फिर ना आये या गाण्यातील टॉवेल स्टेप स्क्रिप्ट मध्ये सामील केली आणि तेव्हाच पहिला कट झाला. त्याचप्रमाणे, दुसऱ्या प्रोमो मध्ये प्रख्यात बॉलीवूड सिनेमांच्या अनेक पोस्टर मधून सलमान चालताना प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या मेगास्टारने हे वेगवान नृत्य लगेच थांबविले आणि त्याच्या प्रसिध्द दबंग स्टेपने प्रोमोचा शेवट केला. प्रोमो मध्ये अजून काही रोमांचित करणाऱ्या गोष्टीं मध्ये टायगर जिंदा है सिनेमातील दिल दी आ गल्लन हे गाणे सलमान खान गुणगुणताना प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

सलमान खानच्याविषयी सेटवरील सूत्रांनी सांगितले की, “त्याच्या सोबत चित्रीकरण करत असताना सलमान खान नेहमीच त्याचा जादुई स्पर्श सामील करतोच. सेटवर त्याने प्रवेश केल्यापासून सेटवरील ऊर्जा वाढली आहे आणि संपूर्ण युनिटला चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. या वेळी सुध्दा त्याने सिक्वेन्स मध्ये त्याची स्वतःची आकर्षकता सामील केली आहे त्यामुळे तो जास्त मनोरंजक आणि लक्षवेधक बनला आहे.” 

Web Title: Salman Khan appears in 'Bigg Boss 12' promo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.