सुमीत समनानीसाठी सलमान आखला डाएट प्लान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 16:58 IST2016-06-30T11:28:18+5:302016-06-30T16:58:18+5:30
‘कलश’या मालिकेतील सुमीत समनानी सलमान खान याच्या ‘सुल्तान’मधून बॉलिवूड डेब्यू करतो आहे. सुमीतने या चित्रपटात सलमानच्या स्पॉन्सरची महत्त्वपूर्ण भूमिका ...

सुमीत समनानीसाठी सलमान आखला डाएट प्लान
‘ लश’या मालिकेतील सुमीत समनानी सलमान खान याच्या ‘सुल्तान’मधून बॉलिवूड डेब्यू करतो आहे. सुमीतने या चित्रपटात सलमानच्या स्पॉन्सरची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ‘सुल्तान’च्या सेटवर सलमानने १४५ किलो वजनाच्या २५ वर्षांच्या सुमीतसाठी एक नाही, दोन नाही तर संपूर्ण वर्षभराचा डाएट प्लान बनवून दिला. शिवाय त्याला तो काटेकोरपणे फॉलो करायलाही सांगितला. मुंबईत ‘सुल्तान’च्या सेटवर सलमान न्याहारी करीत होता. अचानक त्याने सुमीतला बोलवले. सलमानने सुमीतशी मस्तपैकी गप्पा सुरु केल्या. मग काय गप्पा-गप्पांमध्ये सुमीतच्या खाण्याच्या सवयी सलमानने जाणून घेतल्या आणि नंतर त्याच्यासाठी वर्षभराचा डाएट प्लान तयार केला. हा डाएट प्लान फॉलो केल्यानंतर तुला भेटायला आवडेल, हे सांगायलाही सल्लू मियाँ विसरला नाही. सुमीतला तर क्षणभर स्वत:वर विश्वासच बसेना. एका सुपरस्टारने आपल्यासाठी डाएट प्लान बनवावा, हे पाहून मी थक्कच झालो. खरे तर ‘सुल्तान’च्या सेटरवर मी खूपच नर्व्हस होतो. पण सलमानचे प्रेमळ वागणे बघून मी सगळेच विसरलो. त्याचे साधेपण मला प्रचंड भावले, असे सुमीत म्हणाला.
![]()