सलमानने या स्पर्धकाला दिला दम,तर बिग बॉसनेही बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 13:07 IST2017-11-01T07:22:06+5:302017-11-01T13:07:07+5:30

कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन खपवून घेतलं जाणार नाही असा सज्जड इशाराच अभिनेता सलमान खानने शोच्या सुरूवातीलाच सा-या स्पर्धकांना दिला होता.बिग ...

Salman has given this event to the contender, while the Big Boss is going to show an outside road. | सलमानने या स्पर्धकाला दिला दम,तर बिग बॉसनेही बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचा दिला इशारा

सलमानने या स्पर्धकाला दिला दम,तर बिग बॉसनेही बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचा दिला इशारा

णत्याही प्रकारचं गैरवर्तन खपवून घेतलं जाणार नाही असा सज्जड इशाराच अभिनेता सलमान खानने शोच्या सुरूवातीलाच सा-या स्पर्धकांना दिला होता.बिग बॉसमधील वाद, भांडणं, वाईट हरकती यामुळे शोचा होस्ट सलमान खान यानेही शो सोडण्याचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये काय काय घडणार याची रसिकांना उत्सुकता होती. मात्र यावेळी बिग बॉस सीझन-11मध्ये कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन खपवून घेतलं जाणार नाही असा सज्जड इशाराच अभिनेता सलमान खानने दिला आहे.घरात होणारे छोटे मोठे वाद, भांडणं आपण समजू शकतो, मात्र घरात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता किंवा गैरवर्तन बिल्कुल खपवून घेणारच नाही असा इशारा सलमान खानने शोच्या लॉन्चिंगच्या वेळी दिला होता. दरवेळी होणारी टोकाची भांडणं, वादविवाद आणि वाईट हरकती टाळण्यासाठी यावेळी बिग बॉसमध्ये काही कठोर नियम असतील असे संकेतही सलमानने आधीच दिले होते.तरीही काही स्पर्धक बिग बॉसच्या नियमाचे पालन करत नसल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच वाईल्ड कार्ड एंट्री झालेला स्पर्धक प्रियांक शर्माला घरात एंट्री करतेवेळी बिग बॉसने बाहेरच्या कोणत्याच घडामोडी प्रियांक घरातल्या स्पर्धकांना सांगणार नाही असे सांगितले होते.तरीही प्रियांकने बिग बॉसच्या नियमाचे पालन केले नाही.सपना चौधरीला आर्शी खानबद्दल तर अर्शी खानचे सपना चौधरीजवळ त्यांच्या सगळ्या खाजगी गोष्टी सांगितल्या. यामुळे घरात खूप वादही झाला.त्यामुळे 'विकेंड का वॉर'भागात पुन्हा एकदा सलमानला प्रियांकची शाळा घ्यावी लागली.प्रियांकच्या सगळ्या चुका त्याच्या निदर्शनास आणून दिल्या.जर पुन्हा प्रियांकने मिळालेल्या संधीचा गैरवापर केला तर त्याला या घरातून बाहेर जावे लागणार असा सज्जड इशारा सलमानसह बिग बॉसनेही दिला आहे.मात्र प्रियांक या गोष्टीचा जास्त विचार करत नसल्याचेच दिसतंय.त्यामुळेच तो वारंवार स्पर्धकांची सगळी गुपितं उघड करत असल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे सलमान खानने 'विकेंड का वॉर' भागात सज्जड दम दिला असला तरीही त्याने दबंग सलमानलाही जुमानले नसल्याचे दिसतंय.त्यामुळे आगामी काळात बिग बॉसच्या घरात प्रियांक शर्माने वेळीच स्वतःला सावरले नाही तर पुन्हा बाहेर जावे लागणार असंच दिसतंय.  

Also Read Bigg Boss 11:11च्या स्पर्धकांना घरात दाखल होण्याआधीच सलमान खानने दिला सज्जड दम, काय म्हणाला दबंग खान जाणून घ्या ?

Web Title: Salman has given this event to the contender, while the Big Boss is going to show an outside road.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.