सलमानने दिला खास संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 17:07 IST2016-09-09T11:37:54+5:302016-09-09T17:07:54+5:30
बिग बॉस या मालिकेचा दहावा सिझन लवकरच सुरू होणार आहे. या कार्य़क्रमात पहिल्यांदाच सेलिब्रेंटींसोबत सामान्य माणसांचादेखील सहभाग असणार आहे. ...
.jpg)
सलमानने दिला खास संदेश
ब ग बॉस या मालिकेचा दहावा सिझन लवकरच सुरू होणार आहे. या कार्य़क्रमात पहिल्यांदाच सेलिब्रेंटींसोबत सामान्य माणसांचादेखील सहभाग असणार आहे. सामान्य लोकांसाठी सध्या ऑडिशन सुरू असून लोक आपले व्हिडिअो टीमला पाठवत आहेत. हे व्हिडिओ पाहून स्पर्धकांची निवड केली जाणार आहे. सलमाननेदेखील या कार्यक्रमासाठी एक खास संदेश लोकांना दिला आहे. त्याने म्हटले आहे की, "बिग बॉसमध्ये कोणतीही युक्ती उपयोगात येत नाही. या कार्यक्रमातील स्पर्धक 24 तास कॅमेऱ्याच्या समोर असतात. त्यामुळे कोण खोटे बोलते आहे हे लगेचच लक्षात येते. तुम्ही खरे असलात तरच लोकांचे मन जिंकू शकाल." सलमानच्या या संदेशामुळे कार्यक्रमात येऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांना नक्कीच मदत होईल यात काही शंका नाही.