'लेक माझी लाडकी'तील सानिका म्हणजेच नक्षत्रा मेढेकर मिळवतेय चाहत्यांची दाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 17:34 IST2017-09-15T12:04:02+5:302017-09-15T17:34:02+5:30
स्टार प्रवाहच्या 'लेक माझी लाडकी' ही मालिका सुरू होऊन आता जवळजवळ वर्षं झाले आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना ...
'लेक माझी लाडकी'तील सानिका म्हणजेच नक्षत्रा मेढेकर मिळवतेय चाहत्यांची दाद
स टार प्रवाहच्या 'लेक माझी लाडकी' ही मालिका सुरू होऊन आता जवळजवळ वर्षं झाले आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेतील नायिका असलेली सानिका तर चाहत्यांची चांगलीच दाद मिळवत आहे. ही भूमिका साकारणाऱ्या नक्षत्रा मेढेकरला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. तिचे फॅन्स तिला भेटून तिच्या भूमिकेबद्दल नक्कीच कौतुक करत असतात. तिच्या भूमिकेतील त्यांना काय काय आवडते हे तिला आवर्जून सांगतात.
आपली भूमिका प्रेक्षकांना आवडतेय, याचे काही अनुभव नक्षत्राला नुकतेच आले. तिने हे अनुभव शेअर केले आहेत. नक्षत्रा सांगते, गणेशोत्सवानिमित्त मी खरेदीसाठी ठाण्यातल्या एका मॉलमध्ये गेली होती. खरे तर आम्ही कलाकार आमच्या गेटअपपेक्षा खऱ्या आयुष्यात खूपच वेगळे दिसतो. तरीही तिथे असलेल्या एका आजींनी मला लगेचच ओळखले. इतकंच नाही, तर आपल्या सुनेला आणि नातीला बोलावून घेतलं. त्या तिघींनाही माझा अभिनय त्यांना खूप आवडत असल्याचे मला आवर्जून सांगितले आणि या तिघींनी माझ्यासोबत सेल्फी देखील काढला. हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव नाहीये. यापूर्वी मी नगर येथे एका इव्हेंटसाठी गेली होती. नगरमधील एका रेडिओ स्टेशनवर माझी मुलाखत होती. त्या रेडिओ स्टेशनवरील आरजेला मी तिच्या कार्यक्रमासाठी येणार आल्याचे माहीत नव्हते. मात्र, मला पाहिल्यावर ती एकदम खूश झाली. ती माझी खूप मोठी फॅन असल्याचे तिने मला सांगितले. तिने माझ्यासोबत लेक माझी लाडकी या मालिकेविषयी आणि सानिका या व्यक्तिरेखेविषयी खूप साऱ्या गप्पा मारल्या. खलनायक किंवा ग्रे शेड साकारलेल्या कलाकारांवर अनेकदा प्रेक्षक राग व्यक्त करतात. मला मात्र तसा अनुभव आला नाही. उलट, माझी भूमिका ग्रे असूनही प्रेक्षकांना आवडतेय, हे पाहून मला आनंद होत आहे.
भरकटत चाललेल्या आपल्या नवऱ्याला म्हणजेच साकेतला पुन्हा संसाराकडे आकर्षित करायला, मालिकेमध्ये सानिकाने मॉडर्न कपडे परिधान केलेले दिसतात. त्यामुळे तिचा हा लूकदेखील प्रेक्षकांना आवडत असल्याचे तिला भेटल्यानंतर ते आवर्जून सांगतात.
Also Read : हिंदी मालिकेत काम करायचे आहेः सायली देवधर