सई ताम्हणकरने शेअर केला सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो, चाहते झाले घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 17:17 IST2020-12-11T17:15:19+5:302020-12-11T17:17:51+5:30
सई ताम्हणकर लवकरच कलरफुल या चित्रपटात दिसणार आहे.

सई ताम्हणकरने शेअर केला सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो, चाहते झाले घायाळ
अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट ती सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करत असते.
सई ताम्हणकरने नुकतेच तिचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत तिने गुलाबी रंगाचा ब्लेझर आणि पॅन्ट परिधान केली आहे. या फोटोमध्ये सई ग्लॅमरस लूकमध्ये दिसते आहे. सईच्या चाहत्यांनादेखील तिचा अंदाज आवडला आहे. सई सध्या 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या शोमध्ये जजची भूमिका निभावतेय.
सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच कलरफुल या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात सई मीराच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ही एक लव्हस्टोरी आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे त्याच्या या नवीन जोडी विषयी सांगितले की, 'ललित आणि सई हे दोघेही गुणी कलाकार आहेत, दोघांचे काम मी पाहिले आणि अनुभवले सुद्धा आहे, या सगळ्यात 'करण मीरा' हे दोघेच साकारू शकतील या बाबत मी ठाम होतो. सई आणि ललित या दोघांची पात्र जरी वेगळी असली तरी ती प्रेक्षकांना भावतील हा माझा विश्वास आहे.