'सहकुटुंब सहपरिवार'फेम अवनीने चक्क सारा अली खानला बोलावलं भांडी घासायला; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 12:54 IST2023-06-15T12:53:28+5:302023-06-15T12:54:30+5:30

sakshee gandhi: साक्षीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

'Sahkutumb Saahparivar' fame Avni actually called Sara Ali Khan to wash the dishes; The video went viral | 'सहकुटुंब सहपरिवार'फेम अवनीने चक्क सारा अली खानला बोलावलं भांडी घासायला; व्हिडीओ व्हायरल

'सहकुटुंब सहपरिवार'फेम अवनीने चक्क सारा अली खानला बोलावलं भांडी घासायला; व्हिडीओ व्हायरल

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे 'सहकुटुंब सहपरिवार' (sahakutumb sahaparivar). या मालिकेतील मोरे कुटुंबाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. त्यामुळे पडद्यावर वावरणाऱ्या या कलाकारांच्या वैयक्तिक जीवनात काय घडतं हे जाणून घेण्याचाही चाहते प्रयत्न करत असतात. यात या मालिकेतील अवनी म्हणजेच अभिनेत्री साक्षी गांधी(sakshee gandhi). आज सोशल मीडियावर साक्षीचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. त्यामुळे साक्षी सुद्धा चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. यावेळी तिने एक मजेशीर व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या साक्षीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती घरात भांडी घासत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओसोबत तिने अभिनेत्री सारा अली खानचा एव व्हायरल व्हिडीओ जोडला आहे.

साक्षीच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती भांडी घासत असून ती सारा अली खानला भांडी घासायला बोलवत आहे.  विशेष म्हणजे साक्षीने ज्या पद्धतीने हा व्हिडीओ एडिट केलाय त्याचं सगळे जण कौतुक करत आहेत. सोबतच तिने 'न्हाई म्हनली भांडी घासाया', असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.
 

Web Title: 'Sahkutumb Saahparivar' fame Avni actually called Sara Ali Khan to wash the dishes; The video went viral