'सहकुटुंब सहपरिवार'फेम पश्याच्या घरी लगीनघाई; रिअल लाइफ अंजीसोबत पार पडलं केळवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 11:33 IST2023-03-14T11:31:15+5:302023-03-14T11:33:06+5:30

Aakash nalawde: काही दिवसांपूर्वीच आकाशचा साखरपुडा पार पडला आणि आता त्याच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. म्हणूनच, आकाश आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचं सहकुटुंब सहपरिवाराच्या टीमने केळवण केलं.

sahakutumba sahaparivar fame pasha aka aakasha nalawde kelvan photo viral | 'सहकुटुंब सहपरिवार'फेम पश्याच्या घरी लगीनघाई; रिअल लाइफ अंजीसोबत पार पडलं केळवण

'सहकुटुंब सहपरिवार'फेम पश्याच्या घरी लगीनघाई; रिअल लाइफ अंजीसोबत पार पडलं केळवण

छोट्या पडद्यावर विशेष लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'सहकुटुंब सहपरिवार' (sahakutumb sahaparivar).  या मालिकेच्या कथानकाने आणि त्यातील पात्रांनी अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेतील सरु आणि सुर्या प्रेक्षकांनी जितकं प्रेम दिलं, तितकंच प्रेम अन्य कलाकारांनाही मिळत आहे. त्यातलीच एक जोडी म्हणजे पश्या आणि अंजी. आपल्या खट्याळ स्वभावामुळे या दोन्ही कलाकारांनी अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. सध्या या मालिकेतील पश्याच्या म्हणजेच अभिनेता आकाश नलावडे (aakash nalawde) याच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच आकाशचा साखरपुडा पार पडला आणि आता त्याच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. म्हणूनच, आकाश आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचं 'सहकुटुंब सहपरिवारा'च्या टीमने केळवण केलं. या केळवणाचे फोटो अभिनेत्री नंदिता पाटकरने (nandita patkar) शेअर केले आहेत.

नंदिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये संपूर्ण मोरे कुटुंब दिसत असून त्यांनी थाटात आकाशचं केळवण केलं आहे. काही दिवसांपूर्वीच आकाशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लग्नाची पत्रिका शेअर केली होती. दरम्यान, आकाशच्या रिअल लाइफ अंजीचं नाव रुचिका धुरी असं आहे. रुचिका सोशल मीडियावर सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.
 

Web Title: sahakutumba sahaparivar fame pasha aka aakasha nalawde kelvan photo viral