'प्रेमाची गोष्ट' मालिकेत लगीनघाई, सागर-मुक्ताच्या हळदीला दादूस लावणार हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 16:26 IST2023-12-11T16:25:39+5:302023-12-11T16:26:15+5:30
Premachi Goshta : प्रेमाची गोष्ट मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत सध्या सुरु आहे मुक्ता आणि सागरच्या लग्नाची धामधूम.

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत लगीनघाई, सागर-मुक्ताच्या हळदीला दादूस लावणार हजेरी
स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. सध्या मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत सध्या सुरु आहे मुक्ता आणि सागरच्या लग्नाची धामधूम. सईवरच्या प्रेमाखातर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. हो - नाही म्हणता म्हणता, मुक्ता सागर अखेर विवाहबंधनात अडकणार आहेत.
दोन्ही कुटुंबाची मतं, रितीरिवाज वेगवेगळे असले तरी या दोन्ही कुटुंबांना जोडणारा दुवा म्हणजे सई. सईवरच्या याच प्रेमापोटी फक्त सागर आणि मुक्ता नाही तर गोखले आणि कोळी परिवार एकत्र येणार आहे. आता कोळी म्हण्टलं आणि हळदीला धुमशान झालं नाही तर नवल. सागरच्या हळदीसाठी त्याच्या संपूर्ण कुटुंबाने जय्यत तयारी केलीय. एरव्ही मॉडर्न अंदाजात दिसणारा सागर हळदीसाठी पारंपरिक कोळी वेशात दिसणार आहे. खास बात म्हणजे हळदी कार्यक्रमासाठी गायक दादूस हजेरी लावणार आहे.
हळदी कार्यक्रमात दादूस कोळी गाणी गाऊन धमाल करणार आहे. दादूसच्या धमाकेदार कोळी गाण्यांवर संपूर्ण परिवार ठेका धरणार आहे. तिकडे मुक्ताच्या हळदीसाठीही संपूर्ण गोखले कुटुंब एकत्र येणार आहे. मुक्ताला आशीर्वाद देण्यासाठी लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेतील कलाची आई म्हणजेच संगीता देखिल खास हजेरी लावणार आहे. त्यामुळे मुक्ता-सागरच्या हळदीची रंगत द्विगुणीत होणार हे मात्र नक्की. प्रेमाची गोष्ट रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.