'बिग बॉस मराठी ६'चा विजेता कोण होणार? सागर कारंडेने घेतलं 'या' स्पर्धकाचं नाव; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 14:58 IST2026-04-07T14:58:11+5:302026-04-07T14:58:50+5:30

'हा' स्पर्धक जिंकावा, सागर कारंडेची इच्छा

sagar karande out of bigg boss marathi season 6 he says anushree should win this season | 'बिग बॉस मराठी ६'चा विजेता कोण होणार? सागर कारंडेने घेतलं 'या' स्पर्धकाचं नाव; म्हणाला...

'बिग बॉस मराठी ६'चा विजेता कोण होणार? सागर कारंडेने घेतलं 'या' स्पर्धकाचं नाव; म्हणाला...

'बिग बॉस मराठी सीझन ६'चा ग्रँड फिनाले जवळ आला आहे. गेल्या आठवड्यात सागर कारंडे घराबाहेर पडला आणि त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. सागरचा बिग बॉसमधील प्रवास संपल्याने अनेक जण निराश झाले. आता घरात राकेश बापट, राखी सावंत, तन्वी कोलते, रेवा कौरसे, दीपाली सय्यद, विशाल कोटियन आणि अनुश्री माने असे ७ स्पर्धक आहेत. त्यातील तन्वी कोलतेला कालच तिकीट टू फिनाले मिळालं. दरम्यान विजेतेपद कोणाला मिळावं? असं विचारलं असता सागर कारंडेने काय उत्तर दिलं वाचा.

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सागर कारंडेने घरातील वेगवेगळ्या सदस्यांवर भाष्य केलं. अनुश्रीच्या फटकळ बोलण्याबद्दल तो म्हणाला,"मी नेहमीच तिला समजावलं आहे पण ती ऐकत नाही. मग मला असं वाटतं की ठिके ही तिची स्ट्रॅटेजी आहे. तिला अशाच पद्धतीने खेळायचं आहे. मी तिला चांगलं सांगायचा प्रयत्न केला, बोलताना चांगले शब्द वापर असंही मी म्हणालो. पण तिला तिच्याच पद्धतीने खेळायचं आहे. पण अनुश्रीसोबत माझा वेगळा बाँड तयार झाला. मला ती आवडते. मला माझ्या पोरीसारखी वाटते."

तर महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सागरने अनुश्रीचंच नाव 'बिग बॉस मराठी'ची विजेती म्हणून घेतलं. तो म्हणाला, "मला वाटतं अनुश्री विजेती व्हावी. ती छान खेळते. तिचा प्रामाणिकपणा, तिच्यातील गुण आणि तिला खेळ समजतो यामुळे तिची वेगळी ओळख बनली आहे. त्यामुळे ती खऱ्या अर्थाने विजेतेपजाची मानकरी आहे."

दरम्यान, 'बिग बॉस मराठी ६'  आता काहीच आठवड्यात संपणार आहे. बिग बॉसचा महाअंतिम सोहळा १९ एप्रिल २०२६ ला पार पडणार असल्याची चर्चा आहे. चाहते आपल्या आवडत्या सदस्याला सपोर्ट करताना दिसतात. अनेक प्रेक्षकांसाठी आधीच विनर ठरला आहे. अनेक जण तन्वी विजेती होणार असल्याचे म्हणतायत. तर काहीजणांनी विशालला ही सपोर्ट केलाय. रेवा वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून जरी आली असली तरी तन्वीने तिला खूप सांभाळून घेतलं. आता रेवाने तन्वीला सपोर्ट करायला हवा असं काहीजण म्हणताना दिसतात. खरा विजेता कोण होणार हे आता ग्रँड फिनालेलाच कळणार आहे. 

Web Title : बिग बॉस मराठी 6 कौन जीतेगा? सागर कारंडे ने नाम बताया।

Web Summary : हाल ही में बेघर हुए सागर कारंडे ने भविष्यवाणी की है कि अनुश्री माने बिग बॉस मराठी 6 जीतेंगी। उन्होंने उनकी ईमानदारी और खेल की समझ की प्रशंसा की, भले ही उनके मतभेद हों।

Web Title : Who will win Bigg Boss Marathi 6? Sagar Karande reveals name.

Web Summary : Sagar Karande, recently evicted, predicts Anushree Mane will win Bigg Boss Marathi 6. He praises her honesty and understanding of the game, despite their differences.