"फाउंटन पेनची शाई बटाटा घासूनही जात नव्हती...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सचिन गोस्वामींची क्रिप्टिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 09:16 IST2026-01-16T09:16:00+5:302026-01-16T09:16:29+5:30

बोटाला लावण्यात आलेली ही शाई हँडवॉश, नेल पॉलिश रिमुव्हर किंवा सॅनिटायझरने अगदी सहज निघत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. यावरुनच महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

sachin goswami criptic post on blue ink after municipal elections | "फाउंटन पेनची शाई बटाटा घासूनही जात नव्हती...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सचिन गोस्वामींची क्रिप्टिक पोस्ट

"फाउंटन पेनची शाई बटाटा घासूनही जात नव्हती...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सचिन गोस्वामींची क्रिप्टिक पोस्ट

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी(१५ जानेवारी) मतदान पार पडलं. जवळपास ७-८ वर्षांनंतर महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून मैदानात उतरले होते. महानगरपालिकांच्या निवडणुका अनेक कारणांमुळे चर्चेत होत्या. मतदार यादीतील घोळ, बोगस मतदार याबरोबरच निवडणुकीच्या दिवशी आणखी एक मुद्दा सर्वात जास्त चर्चेत होता तो म्हणजे मतदान झाल्यानंतर बोटाला लावण्यात येणारी निळी शाई. पण, या निवडणुकीत शाईऐवजी मार्करचा वापर केला गेला. बोटाला लावण्यात आलेली ही शाई हँडवॉश, नेल पॉलिश रिमुव्हर किंवा सॅनिटायझरने अगदी सहज निघत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. 

यावरुनच महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. "शाळेत फाउंटन पेनची शाई कोणी शर्टावर शिंपडली की बटाटा घासून पण जायची नाही... चिवट होती ती...", असं सचिन गोस्वामींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. सचिन गोस्वामींच्या या पोस्टवर काही चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. एकाने कमेंटमध्ये "पुर्वी दोन महीने लागायचे शाई जायला...आजच पुसट झालीये", असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "आजच्या शाईवर डिओस्प्रे करा लगेच निघते आहे", अशी कमेंट केली आहे. काहींनी बोटाला लावलेल्या शाईचा फोटोही शेअर केला आहे. 

दरम्यान, १५ जानेवारीला झालेल्या महानगरपालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. २९ महानगरपालिकांपैकी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडची निवडणुक अटीतटीची मानली जात होती. आता निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

Web Title : फाउंटेन पेन की स्याही की जिद्दीपन बनाम आसानी से हटाने योग्य चुनाव मार्कर।

Web Summary : नगर निगम चुनावों में आसानी से हटाने योग्य मार्कर स्याही के उपयोग के बाद, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' के सचिन गोस्वामी ने कभी न मिटने वाली फाउंटेन पेन स्याही को याद किया, जिससे सोशल मीडिया पर बहस छिड़ गई। कड़ी टक्कर वाले चुनावों के नतीजों का इंतजार है।

Web Title : Fountain pen ink's stubbornness versus the easily removable election marker.

Web Summary : After municipal elections used easily removable marker ink, Sachin Goswami of 'Maharashtrachi Hasyajatra' reminisced about the indelible fountain pen ink, sparking social media debate. Results of closely contested elections are awaited.