'कोरोनावर मात केली पण नशीबात होते काही वेगळेच...', 'साथ निभाना साथिया' फेम रुचा हसबनीसवर कोसळला दुःखाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 16:22 IST2020-08-15T16:21:32+5:302020-08-15T16:22:12+5:30
साथ निभाना साथिया मालिकेतील अभिनेत्री रुचा हसबनीसवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

'कोरोनावर मात केली पण नशीबात होते काही वेगळेच...', 'साथ निभाना साथिया' फेम रुचा हसबनीसवर कोसळला दुःखाचा डोंगर
साथ निभाना साथिया फेम अभिनेत्री रुचा हसबनीसवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या वडीलांचे नुकतेच निधन झाले आहे. तिच्या वडीलांना कोरोना व्हायरस झाला होता. पण , त्यांनी कोरोनावर यशस्वी मातदेखील केली होती. मात्र इतर कारणांमुळे त्यांचे निधन झाले. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे. रुचाने याबद्दल पोस्ट करत सांगितले की, कसे तिच्या वडीलांनी कोरोनावर मात केली पण नशीबात काही वेगळेच होते.
रुचा हसबनीसच्या वडिलांनी 8 ऑगस्टला अखेरचा श्वास घेतला होता. तिने वडीलांच्या आठवणीत भावूक होत लिहिले की, डॅडी, मी ताऱ्यांच्या पलिकडे तुम्हाला पाहेन. तर तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, आता तुम्ही शांततेत झोपा डॅडी.
2 ऑगस्ट रोजी रुचा हसबनीसने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत वडिलांच्या तब्येतीची अपडेट दिली होती. तिने लिहिले होते की, माझ्या वडिलांनी कोरोनावर मात केली. पण आता ते फुफ्फुसाच्या रिकव्हरीसाठी सामना करत आहेत. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि आशा करते ते लवकर बरे होतील. तुम्ही देेखील आपली स्वतःकडे लक्ष द्या.
रुचा हसबनीस ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तिने साथ निभाना साथिया मालिकेत राशी मोदीची भूमिका साकारली होती.