Saath Nibhana Saathiya: अॅक्ट्रेस लवी सासन थायलंडमध्ये दिसली कुल अंदाजात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2017 15:07 IST2017-07-17T09:37:14+5:302017-07-17T15:07:14+5:30
'साथ निभाना साथीया' मालिकेत परिधी नावाची भूमिका साकारणारी लवी सासन सध्या थायलंडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. थायलंडमध्ये क्लिक केलेले तिचे ...
.jpg)
Saath Nibhana Saathiya: अॅक्ट्रेस लवी सासन थायलंडमध्ये दिसली कुल अंदाजात
' ;साथ निभाना साथीया' मालिकेत परिधी नावाची भूमिका साकारणारी लवी सासन सध्या थायलंडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. थायलंडमध्ये क्लिक केलेले तिचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.फोटोत ती मस्त निवंता एन्जॉय करताना दिसतेय.आता साथ निभाना साथीया मालिका संपणार आहे. 25 जुलैला या मालिकेचा शेवटचा भाग रसिकांना पाहता येणार आहे.त्यानुसार कलाकारांनी त्यांच्या शेवटच्या भागाचे शूटिंग करतानाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानुसार परिधीचा शेवटचे शूट बरेच दिवस आधीच संपले होते. त्यामुळे मिलालेल्या वेळेत निवांत एन्जॉय करण्याचा तिने प्लॅन केला होता. आता मालिका संपणार म्हटल्यावर लवी नवीन कामाच्या शोधातही असल्याचे कळतंय.मात्र इतके वर्ष ही मालिका केल्यानंतर आता ती थोडे दिवस ब्रेक घेणार आहे.परिधी आता थायलंडमध्ये आहे आणि सतत तिचे फोटो शेअर करत आहे. या सर्व फोटोमध्ये तिचा स्टायलिश लूकमध्ये पाहायला मिळतेय.मालिका संपणार त्यामुळे तिचे चाहतेही तिला नवीन भूमिकेत कधा झळकणार असे प्रश्न विचारताना दिसतायेत.त्यानंतर पुन्हा एकदा नवीन भूमिकेची सुरूवात ती करणार आहे.पण लवीला पुन्हा टीव्हीवर पाहण्यासाठी थोडी वाट पहावी लगणार आहे.कारण लवी लग्न करण्याचे विचारातही आहे.लवी सासन ब्वॉयफ्रेंड कौशिक कृष्णमूर्तिसह लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळते.कौशिक आणि लवी हे दोघेही एकमेकांना ब-याच वर्षापासून रिलेशनशीपमध्ये आहेत.लवी सासन प्रमाणेच साथ निभाना साथीया मालिकेतली 'गोपी बहु' म्हणजेच देबोलीना भट्टाचार्याचेही व्हॅकेशन मुडमधले फोटो व्हायरल झाले आहेत.मात्र तीचे हे फोटो एका प्रोजेक्टसाठी केलेेल फोटोशूट होते.फेमस स्टायलिश रेहान शाहने देबोलिनाचा लूकवर मेहनत घेतली असून देबोलिनाला ग्लॅमरस लूक देण्यासाठी त्याचे आभारही मानलेत.तिच्या शेअर झालेल्या फोटोंना खूप चांगल्या प्रतिक्रीया मिळत आहेत.सध्या मालिकेतील कलाकार त्यांच्या स्विट मेमरीमध्ये मग्न असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळतंय.