मराठी अभिनेत्याचं ठरलं! आधी गुपचूप साखरपुडा केला आता लग्नाच्या बेडीत अडकणार, केळवणाचे फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 16:12 IST2024-08-07T16:11:39+5:302024-08-07T16:12:14+5:30

काही महिन्यांपूर्वीच अभिषेकने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोनाली गुरव हिच्याशी साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. आता अभिषेक आणि सोनाली यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. लवकरच हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 

saar kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar and sonalee gurav to tie knot kelvan photo | मराठी अभिनेत्याचं ठरलं! आधी गुपचूप साखरपुडा केला आता लग्नाच्या बेडीत अडकणार, केळवणाचे फोटो समोर

मराठी अभिनेत्याचं ठरलं! आधी गुपचूप साखरपुडा केला आता लग्नाच्या बेडीत अडकणार, केळवणाचे फोटो समोर

'सारं काही तिच्यासाठी' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत सध्या श्रीनूच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. पण, मालिकेत श्रीनू हे पात्र साकारणारा अभिनेता अभिषेक गावकर खऱ्या आयुष्यातदेखील लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.  काही महिन्यांपूर्वीच अभिषेकने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोनाली गुरव हिच्याशी साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. आता अभिषेक आणि सोनाली यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. लवकरच हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 

अभिषेक आणि सोनालीच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. नुकतंच त्यांचं पहिलं केळवण पार पडलं. याचे फोटो समोर आले आहेत. अभिषेक आणि सोनालीने इन्स्टाग्रामवरुन पहिल्या केळवणाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. रेस्टाँरंटमध्ये त्यांचं हे केळवण पार पडल्याचं दिसत आहे. या व्हिडिओत ते एकमेकांना केक भरवताना दिसत आहेत. अभिषेक आणि सोनालीच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, अभिषेकने 'रात्रीस खेळ चाले', 'सुख म्हणजे नक्की काय असतं,' 'माझी माणसं', 'हंडरेड डेज' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर सोनाली एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. ती इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असून तिचे ३ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तिचे अनेक रील व्हिडिओही व्हायरल होत असतात. 

Web Title: saar kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar and sonalee gurav to tie knot kelvan photo