ऋतुजा बागवेची नवी मालिका 'माटी से बंधी डोर', भूमिकेबद्दल अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 05:21 PM2024-05-23T17:21:58+5:302024-05-23T17:22:11+5:30

Maati Se Bandhi Dor : 'माटी से बंधी डोर' ही मालिका वैजू या व्यक्तीरेखेची कथा आहे जी शेतात काम करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावत असते. प्रत्यक्षात तिच्या नशीबात काहीतरी वेगळेच लिहिलेले असते.

Rutuja Bagwe's new serial 'Maati Se Bandhi Dor', the actress said about her role... | ऋतुजा बागवेची नवी मालिका 'माटी से बंधी डोर', भूमिकेबद्दल अभिनेत्री म्हणाली...

ऋतुजा बागवेची नवी मालिका 'माटी से बंधी डोर', भूमिकेबद्दल अभिनेत्री म्हणाली...

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) हिने विविधांगी भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. शेवटची ती लंडन मिसळ सिनेमात झळकली होती. आता ती हिंदी मालिकेत काम करताना दिसणार आहे. 'माटी से बंधी डोर' (Maati Se Bandhi Dor)असे या मालिकेचे शीर्षक असून या मालिकेत ऋतुजा वैजयंती (वैजू)ची व्यक्तीरेखा साकारत आहे, तर अंकित गुप्ता रणविजयच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

'माटी से बंधी डोर' ही मालिका वैजू या व्यक्तीरेखेची कथा आहे जी शेतात काम करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावत असते. प्रत्यक्षात तिच्या नशीबात काही औरच लिहिलेले असते. वैजूची नाळ जितकी आपल्या कुटुंबासोबत जोडलेली आहे तितकेच घट्ट नाते तिचे आपल्या गावाशीही आहे. त्यामुळे प्रचंड मेहनत करुन या गावाचा कायापालट करायचा हे वैजूचे एकमेव लक्ष्य आहे.

मालिकेबद्दल ऋतुजा बागवे, "आगामी प्रोमोमध्ये प्रेक्षक वैजूचे ड्रीम सिक्वेन्स पाहतील, जे वैजू व रणविजय यांच्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असतील. वैजू ही प्रामाणिक मुलगी आहे. त्यामुळे जेव्हा ती रणविजयशी बोलते तेव्हा त्याला ती कोणत्याही दृष्टीकोनातून शिष्ट वाटत नाही व तो सहजपणे तिला पैलवान म्हणतो. त्यामुळे तिला दु:ख होते. परंतु ऋतुजाला वैजूला सांगायचे आहे की तिने दु:खी होऊ नये आणि स्वत:प्रती कायम प्रामाणिक रहावे. कारण जगाला तिच्यासारख्या लोकांची गरज आहे जे ईमानदार असतील न की चालाख." 'माटी से बंधी डोर' ही मालिका येत्या २७ मे पासून स्टार प्लसवर दररोज सोमवार ते रविवार संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होणार आहे.

Web Title: Rutuja Bagwe's new serial 'Maati Se Bandhi Dor', the actress said about her role...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.