"आजही मत मांडणारी मुलगी लोकांना आवडत नाही" ऋतुजा बागवेनं माडलं परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 12:31 IST2025-03-09T12:30:40+5:302025-03-09T12:31:48+5:30

ऋतुजा बागवेचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

Rutuja Bagwe Talk About Women Rights | Mati Se Bandhi Dor | International Women's Day2025 | "आजही मत मांडणारी मुलगी लोकांना आवडत नाही" ऋतुजा बागवेनं माडलं परखड मत

"आजही मत मांडणारी मुलगी लोकांना आवडत नाही" ऋतुजा बागवेनं माडलं परखड मत

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) हिने विविधांगी भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. अनेकदा देशातील सामाजिक व राजकीय मुद्यांवर ती परखड मत मांडताना दिसते. अशताच ऋतुजा बागवेचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. ज्यामध्ये तिनं महिलांवर भाष्य केलंय.

लोकमतशी बोलताना ऋतुजा बागवे म्हणते, "आजही मत मांडणारी मुलगी आवडत नाही. त्यांना असं वाटतं ही अती बोलतेय किंवा हिला मत असू शकतात, ही का मांडतेय. तर मला असं वाटतं, तिच मत चुकीचं असू शकतं किंवा बरोबरही असू शकतं. पण, तिला मतच असू नये. हे जे काही लोकांचं म्हणणं असतं ना. ते मला खटकतं. तर आज आपण एवढ्या Independent आहोत. आपण इतक्या शिकलेल्या आहोत. आपल्याला आपलं मत मांडण्याची मुभा असली पाहिजे".

ती म्हणाली, "मग पुढे जे काही असेल. तडजोड तर आपण सगळ्याच करत असतो. पण अन्याय सहन करणं, पण तितकाच मोठा गुन्हा आहे. त्यामुळे तडजोड आणि अन्याय यात पुसटशी रेषा आहे. ती आपल्या प्रत्येकाला माहिती असते तर मग योग्य वेळी त्याच्यावर आवाज उठवलाच पाहिजे. मग ते काहीही असो. छळणूक मगत ती मानसिक असू दे किंवा शाररिक असू दे किंवा तुमच्या 'स्वत्वा'चीअसू दे. कधी-कधी तुम्हाला, तुमच्या मतांना तेवढा आदर दिला जात नाही, तर का की तुम्ही मुली आहात म्हणून. मला ते आवडत नाही".


ऋतुजा बागवे  शेवटची  लंडन मिसळ सिनेमात झळकली होती. तसेच ती सध्या स्टार प्लस वाहिनीवरील 'माटी से बंधी डोर' (Mati Se Bandhi Dor) या मालिकेत काम करतेय.  ऋतुजा बागवे आणि अंकित गुप्ता (Ankit Gupta) मुख्य भूमिका निभावत आहेत. ऋतुजा बागवे ही वैजयंती (वैजू) ही भूमिका साकारत आहे  वैजू ही एक खंबीर, स्वतंत्र स्त्री आहे, जी निर्भयतेचे मूर्त रूप आहे.

Web Title: Rutuja Bagwe Talk About Women Rights | Mati Se Bandhi Dor | International Women's Day2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.