ऋतुजा बागवेनं सुरू केलं स्वत:चं नवीन रेस्टॉरंट, नाव ठेवलंय खूपच खास, शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 13:43 IST2025-07-27T13:43:31+5:302025-07-27T13:43:50+5:30
ऋतुजाने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवत एक नवीन सुरुवात केली आहे.

ऋतुजा बागवेनं सुरू केलं स्वत:चं नवीन रेस्टॉरंट, नाव ठेवलंय खूपच खास, शेअर केला व्हिडीओ
Rutuja Bagwe Started New Restaurant: ऋतुजा बागवे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ऋतुजा बागवे आज यशाच्या शिखरावर आहे. सोशल मीडियाद्वारे ती प्रेक्षकांच्या संपर्कात असते. आयुष्याविषयीचे अपडेट ती शेअर करत असते. तिच्या लेटेस्ट पोस्टमध्येही तिने एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे. ऋतुजाने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवत एक नवीन सुरुवात केली आहे. ऋतुजाच्या नवीन रेस्टॉरंटच्या (Rutuja Bagwe Restaurant) उद्घाटन सोहळ्याला लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे उपस्थित होता.
ऋतुजा बागवेने अंधेरी पूर्व, मरोळ परिसरात तिचं नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे. अभिनेत्रीच्या नव्या हॉटेलचं नाव 'फूडचं पाऊल' (Foodcha Paool Andheri) असं आहे. या रेस्टॉरंटमध्ये खवय्यांना व्हेज व नॉन व्हेज अशा दोन्ही पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. ऋतुजाने इन्स्टाग्रामवर रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केलाय. ऋतुजाने तिच्या या व्हिडीओवर मराठी कलाकारांसह चाहत्यांनी नव्या व्यवसायासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
२०२५ हे वर्ष ऋतुजासाठी अगदीच खास आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही. बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि धमाकेदार काम करून ती चर्चेत आहे. तिच्या अभिनयाचं कायम कौतुक होतं. अलिकडेच ती 'अंधारमाया' या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भुमिकेत पाहायला मिळाली होती. ऋतुजा बागवेनं मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात तिने अभिनयाचा ठसा उमटवला आणि प्रेक्षकांचे मन जिंकले. काही महिन्यांपूर्वीच तिने 'माटी से बंधी डोर' या हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. छोट्या पडद्यासोबत ऋतुजा रंगभूमीवरही रमते. तिची प्रमुख भूमिका असलेले 'अनन्या' हे नाटक खूप गाजले. या मालिकेत तिने एका दिव्यांग मुलीची भूमिका साकारली आहे.