ईदच्या शुभेच्छा दिल्याने रुचिराला चाहत्यांनी केलं Unfollow; अभिनेत्री म्हणाली- 'गीतेतला कर्मयोग समजला असता तर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 10:28 AM2024-06-18T10:28:53+5:302024-06-18T10:29:27+5:30

अभिनेत्री रुचिरा जाधवने शुटींगनिमित्ताने बकरी ईदला खास फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. रुचिराने त्यावर लोकांना खणखणीत उत्तर दिलंय (ruchira jadhav)

ruchira jadhav troll for sharing bakri eid photos actress gives answer to netizens | ईदच्या शुभेच्छा दिल्याने रुचिराला चाहत्यांनी केलं Unfollow; अभिनेत्री म्हणाली- 'गीतेतला कर्मयोग समजला असता तर...'

ईदच्या शुभेच्छा दिल्याने रुचिराला चाहत्यांनी केलं Unfollow; अभिनेत्री म्हणाली- 'गीतेतला कर्मयोग समजला असता तर...'

'बिग बॉसमराठी  ४' मध्ये अभिनेत्री रुचिरा जाधव सहभागी झाली होती. रुचिरा सोशल मीडियावर विविध पोस्टच्या माध्यमातून सक्रीय असते. रुचिराला नुकतंच तिच्या चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला आहे. याचं कारण म्हणजे रुचिराने काल झालेल्या बकरी ईदनिमित्त सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. रुचिराने दिलेल्या ईदच्या शुभेच्छा आणि शेअर केलेले फोटो नेटिझन्सना मात्र आवडले नाहीत. अनेकांनी रुचिराला अनफॉलो केलं. यावर रुचिरानेही रोखठोक उत्तर दिलं. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण

रुचिराने नेटिझन्सना दिलं खणखणीत उत्तर

रुचिराने काल झालेल्या बकरी ईदच्या दिवशी खास फोटो पोस्ट करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावर अनेकांनी तिला वाईट शब्दात ट्रोल केलं. याशिवाय काही नेटिझन्सनी रुचिराला सोशल मीडियावर unfollow केलं. या सर्वांना रुचिराने उत्तर दिलंय. तिने कमेंटमध्ये लिहिलंय की, 'तुम्ही दिलेल्या नकारात्मक प्रतिक्रिया पाहून मला आश्चर्य आणि धक्का बसलाय. मी जी कुर्ती घातलीय ती डेनिमची आहे. सोबत मी स्कार्फ बांधला आहे. हा माझा 'पोशाख' आहे. कॅमेऱ्यासमोर "ॲक्ट करायचं" माझं काम आहे आणि मी तेच करतेय. कर्म आणि धर्म “पूर्णपणे” समजण्याऱ्यांसाठी ही पोस्ट. बाकीच्यांना मला काय बोलावं खरंच कळत नाहीय! महाराजांचा उल्लेख करणाऱ्यांना मला विचारायचंय 'महाराजांनी कधी दुसऱ्या धर्माचा निरादर करायला शिकवला?' माझ्या Bio वर प्रश्न विचारणाऱ्या सर्वांना एवढंच म्हणेन, “गीतेला कर्मयोग समजला असता तर तुमची प्रतिक्रिया वेगळी असती" तुमच्या भावनांचा आदर आहे. पण याचा अर्थ असा नाही की "तुमचा दृष्टीकोन प्रत्येक वेळी योग्य असेल". हरे कृष्णा.  मी काय करतेय याची मला पूर्ण कल्पना आहे. #WiseNotBlind'

 रुचिराने पोस्ट केलेल्या फोटोंंवर चाहत्यांची नाराजी

दरम्यान रुचिरा सध्या बहरीन देशात आहे. तिथे ती एका आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल शोचं शूटींग करतेय. त्यानिमित्ताने रुचिराने खास पोशाख परिधान करत बहरीनमधील एका मशिदीत फोटोशूट केलं. हे फोटो तिने पोस्ट करत सर्वांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. पण रुचिराने दिलेल्या या शुभेच्छा चाहत्यांच्या खटकल्या. त्यांनी रुचिरावर सडकून टीका केली. त्यामुळे रुचिराने सर्वांना परखड शैलीत उत्तर दिलंय. 
 

Web Title: ruchira jadhav troll for sharing bakri eid photos actress gives answer to netizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.