"मी जीन्समध्ये सुद्धा मंदिरात जाते", बिकिनीवरुन ट्रोल करणाऱ्यांना रुचिराने सुनावलं, म्हणाली- "कुठे काय घालायचं हे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 16:56 IST2025-10-05T16:55:45+5:302025-10-05T16:56:05+5:30
अभिनयासोबत रुचिरा तिच्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असते. अनकेदा ती बिकिनीतील फोटोही शेअर करताना दिसते. मात्र यामुळे तिला अनेकदा ट्रोलही केलं जातं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रुचिराने यावर भाष्य केलं आहे.

"मी जीन्समध्ये सुद्धा मंदिरात जाते", बिकिनीवरुन ट्रोल करणाऱ्यांना रुचिराने सुनावलं, म्हणाली- "कुठे काय घालायचं हे..."
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेमुळे अभिनेत्री रुचिरा जाधव प्रसिद्धीझोतात आली. सध्या ती 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. अनेक निगेटिव्ह भूमिका तिने साकारल्या आहेत. त्यामुळे आता रुचिरा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय खलनायिका झाली आहे. रुचिराचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेस्ट देत असते. अभिनयासोबत रुचिरा तिच्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असते. अनकेदा ती बिकिनीतील फोटोही शेअर करताना दिसते. मात्र यामुळे तिला अनेकदा ट्रोलही केलं जातं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रुचिराने यावर भाष्य केलं आहे.
रुचिराने नुकतीच लोकशाही या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, "मी कृष्णाच्या मंदिरात पण जाते. समुद्रावरचे स्विम सुट किंवा बिकिनीमधील फोटो जर मला सोशल मीडियावर टाकावेसे वाटले तर मी ते टाकत असते. पण लोक या दोन गोष्टी एकत्र का करत्यात? या दोन वेगवेगळ्या पोस्ट आहेत ना! माझ्या इस्कॉन मधल्या मंदिराच्या फोटोखाली तुम्ही असं नाही म्हणू शकत की हिचं बाकीचं प्रोफाइल पाहा... ती सुद्धा मी आहे आणि ही सुद्धा मीच आहे. मला माझ्या दोन्ही बाजू कशा सांभाळायचा या माहित आहेत. कुठे काय घालायचं हे मला कळतं".
"मी मंदिरात साडी किंवा ड्रेस घालते. खरं तर मी जशी असेल तशी जाते. समजा कधी मी शूट वरून लवकर फ्री झाले तर मी तोंडावर स्कार्फ गुंडाळून तिथे जाते. मंदिरात आपण मेकअप वगैरे करून जात नाही. त्यामुळे शूट वरून सुटल्यावर जर मला वाटलं की मंदिरात जायचं आहे तेव्हा मी फक्त नीट प्रेझेंटटेबल कपडे आहेत ना याची दक्षता घेते. जीन्स पॅन्टमध्येसुद्धा मी मंदिरात जाते, डोक्यावर स्कार्फ गुंडाळते. तिथे गेल्यावर माझ्या मनातला भाव माझ्या देवासाठी महत्त्वाचा असतो हे मला माहित आहे. त्यामुळे मंदिरात जाताना मी काय घालायचं काय नाही हे मला कळतं. बीचवर काय घालायचं हे मला माहित आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या गोष्टी कृपया मिक्स करू नका", असंही तिने पुढे म्हटलं आहे.