गरोदरपणातही रुबिना दिलैकचा व्यायाम, सोशल मीडियावरुन होतोय कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 10:57 IST2023-10-12T10:56:39+5:302023-10-12T10:57:03+5:30

रुबिना तिच्या गरोदरपणातील काळ एन्जॉय करताना दिसत आहे. अनेक फोटो आणि व्हिडिओ रुबिना शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवरुन व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

rubina dilaik doing exercise in pregnancy shared video goes viral | गरोदरपणातही रुबिना दिलैकचा व्यायाम, सोशल मीडियावरुन होतोय कौतुकाचा वर्षाव

गरोदरपणातही रुबिना दिलैकचा व्यायाम, सोशल मीडियावरुन होतोय कौतुकाचा वर्षाव

टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच रुबिनाने सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. रुबिना तिच्या गरोदरपणातील काळ एन्जॉय करताना दिसत आहे. अनेक फोटो आणि व्हिडिओ रुबिना शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवरुन व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

रुबिना गरोदरपणात खूप काळजी घेताना दिसत आहे. प्रेग्नेट असूनही ती नियमित व्यायाम करते. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत रुबिना व्यायाम करताना दिसत आहे. रुबिनाचा हा व्हिडिओ गरोदर महिलांना प्रेरणा देणारा आहे. या व्हिडिओला तिने "ती कणखर आहे, ती अजिंक्य आहे, ती कोण आहे? ती तू आहेस...आणि मला तिच्यावर गर्व आहे," असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहते तिचं कौतुक करत आहेत. 

रुबिना आणि अभिनव शुक्लाने २०१८मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. ‘बिग बॉस १४’मध्ये ते दोघं सहभागी झाले होते. या पर्वाची रुबिना विजेतीही ठरली होती. रुबिना आणि अभिनव घटस्फोट घेत विभक्त होण्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण, ‘बिग बॉस’मुळे त्यांच्यातील वाद मिटले आणि त्यांनी वेगळं न होण्याचा निर्णय घेतला. आता लग्नाच्या पाच वर्षांनी आईबाबा होणार असल्यामुळे ते आनंदी आहेत.

Web Title: rubina dilaik doing exercise in pregnancy shared video goes viral