रुबीना दिलैक ठरली ‘खतरों के खिलाडी १२' ची विजेती ? Video Viral
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 16:20 IST2022-07-18T16:19:26+5:302022-07-18T16:20:07+5:30
रुबीना दिलैक ही बिग बॉस सीझन 14 ची विजेती ठरली होती. हा शो जिंकल्यानंतर रूबीनाची लोकप्रियताही अधिक वाढली होती.

रुबीना दिलैक ठरली ‘खतरों के खिलाडी १२' ची विजेती ? Video Viral
छोट्या पडद्यावरील 'खतरों के खिलाडी' या रियालिटी शोची रसिकांना उत्सुकता असते.दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालक असलेला हा रियालिटी शो रसिकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. लवकरच या रियालिटी शोचं बारावं पर्व रसिकांच्या भेटीला येत आहे. 'खतरो के खिलाडी'चा हा सीझन आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये पार पडला. या शोमध्ये सहभागी सेलिब्रिटींना एकाहून एक खतरनाक स्टंट करावे लागले. त्याच सेलिब्रिटींमध्ये रुबीना दिलैकसुद्धा होती.तिलाही हे सगळे स्टंट करावे लागले.'खतरों के खिलाडी'चे शूट आता संपले आहे. शोचे सर्व स्पर्धक आता आपापल्या घरी परतले आहेत. रुबिना दिलैक देखील विमानतळावर स्पॉट झाली आणि याच दरम्यान तिचा पती अभिनव शुक्ला तिला घेण्यासाठी आला होता.
मीडियाचे कॅमेरे दिसताच अभिनवने रुबीना विजेती असल्याचे असेच काही सांगताना दिसला तरी दुसरीकडे तिला मिठीही मारताना दिसतोय.व्हि़डीओ पाहून रुबीनाच या सिझनची विजेती असल्याचे तुम्हालाही वाटेल. अभिनव आणि रुबिनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, काही लोकांचा असाही विश्वास आहे की रुबिना फायनलपूर्वीच शोमधून बाहेर पडली आहे.
हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, रुबिना टॉप 3 मध्ये पोहोचू शकली नसल्याचा दावा एका फॅनपेजने केला आहे. सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार रुबिनाही टॉप 5 मध्ये होती. ज्या ताकदीने ती टास्क करताना दिसली ती विजेती म्हणून बघितली जात होती. 'खतरों के खिलाडी 12' च्या फॅन पेज khatronkekhiladi.12.tazakhabar नुसार, रुबीना टॉप 4 च्या यादीत पोहचू शकली नाही. आता टॉप 4 मध्ये पोहोचलेले स्पर्धक तुषार कालिया, मोहित मलिक, मिस्टर फैजू आणि जन्नत जुबेर आहेत. रुबीना दिलैक ही बिग बॉस सीझन 14 ची विजेती ठरली होती. हा शो जिंकल्यानंतर रूबीनाची लोकप्रियताही अधिक वाढली होती. तिच्या चाहत्यावर्गातही प्रचंड वाढ झाली होती. सोशल मीडियावरही रुबीनाच्या चाहत्यांची संख्या अमाप होती.