प्रतीका रावसोबत मोहित सेहगल करणार रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 14:56 IST2017-07-19T09:26:58+5:302017-07-19T14:56:58+5:30

लव्ह का है इंतजार या मालिकेची कथा प्रेक्षकांना नेहमीच खिळवून ठेवते. त्यामुळे या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांचा खूप चांगला ...

Romance to Mohit Sehgal with Prakka Rao | प्रतीका रावसोबत मोहित सेहगल करणार रोमान्स

प्रतीका रावसोबत मोहित सेहगल करणार रोमान्स

्ह का है इंतजार या मालिकेची कथा प्रेक्षकांना नेहमीच खिळवून ठेवते. त्यामुळे या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद प्रेक्षकांना मिळत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना किथ सिक्वेरा आणि संजिदा शेख यांची जोडी पाहायला मिळते. प्रेक्षकांना त्यांची ही जोडी खूपच आवडते. त्यासोबत या मालिकेत आता आणखी एक जोडी दिसणार आहे. या मालिकेत प्रतीका राव महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 
आता लव्ह का है इंतजार या मालिकेच्या फॅन्ससाठी खूप चांगली बातमी आहे. या मालिकेच्या कथानकाला एक वळण मिळणार आहे. प्रतीकासाठी या मालिकेत आता हिरोची एंट्री होणार आहे. पण प्रतीकासोबतचा कलाकार शोधण्यासाठी मालिकेच्या टीमला खूपच मेहनत घ्यावी लागली आहे. अयान मेहता असे प्रतीकाच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीचे नाव असणार आहे. करण वाही या मालिकेत अयानची भूमिका साकारणार असल्याचे ठरले होते. पण त्याने शेवटच्या क्षणी या मालिकेत काम न करण्याचे ठरवले असल्याने मालिकेच्या टीमची चांगलीच पंचाईत झाली. करण आणि प्रोडक्शन हाऊसचे मानधनावर एकमत होत नसल्याने त्याने ही मालिका न करण्याचे ठरवले. त्यानंतर करणची जागा मोहित सेहगलने घेतली आहे. मोहित आता या मालिकेत अयान ही भूमिका साकारणार आहे. 
मोहित सेहगल नुकताच त्याची प्रेयसी सान्या इराणीसोबत नच बलियेमध्ये झळकला होता. आता लव्ह का है इंतजार या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी तो खूपच उत्सुक आहे. याविषयी तो सांगतो, अयान ही खूप इंटरेस्टिंग व्यक्तिरेखा आहे. मी मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात केली आहे. मालिकेच्या टीमसोबत काम करायला मला खूपच मजा येत आहे. प्रतीका ही खूप चांगली अभिनेत्री असून प्रेक्षकांना माझी भूमिका आवडेल याची मला खात्री आहे. 

Also Read : रोचेल राव आणि मी पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणारः किथ सिक्वेरा

Web Title: Romance to Mohit Sehgal with Prakka Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.