n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">जाना ना दिल से दूर या मालिकेत लवकरच शशांक व्यासची एंट्री होणार आहे. शशांक या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. बालिकावधू या मालिकेतील शशांकची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. शशांक पुन्हा मालिकेत येणार असल्याचा त्याच्या फॅन्सना प्रचंड आनंद होत आहे. या मालिकेत शशांकच्या आईची भूमिका साकारण्यासाठी सोनाली बेंद्रेचा विचार केला जात आहे. सोनालीने याआधी अजीब दास्ताँ है ये या मालिकेत काम केले आहे. जाना ना दिल से दूर या मालिकेत शशांक व्यासच्या आईची भूमिका ही खूप महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे ही भूमिका कोणत्यातरी चांगल्या कलाकाराने साकारावी असे प्रोडक्शन हाऊसचे म्हणणे आहे. सोनाली या भूमिकेसाठी होकार देते की नाही हे काही दिवसांतच कळेल.