कहने को हसमफर है या वेबसिरिजमध्ये पूजा बॅनर्जी साकारणार रोनित रॉयच्या मुलीची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 16:54 IST2017-09-01T11:24:43+5:302017-09-01T16:54:43+5:30
अल्टबालाजीच्या अनेक वेबसिरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. साक्षी तन्वर आणि राम कपूर यांची प्रमुख भूमिका असलेली वेबसिरिज काही दिवसांपूर्वी ...

कहने को हसमफर है या वेबसिरिजमध्ये पूजा बॅनर्जी साकारणार रोनित रॉयच्या मुलीची भूमिका
अ ्टबालाजीच्या अनेक वेबसिरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. साक्षी तन्वर आणि राम कपूर यांची प्रमुख भूमिका असलेली वेबसिरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या वेबसिरिजमध्ये एक मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा एका मॅच्युअर्ड लव्ह स्टोरीवर आधारित एक वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कहने को हसमफर है असे या वेबसिरिजचे नाव असून यात रोनित रॉय आणि मोना सिंग प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
रोनित आणि मोना हे दोघेही छोट्या पडद्यावरचे दिग्गज कलाकार असल्याने त्यांची ही वेबसिरिजदेखील तितकीच चांगली असणार अशी प्रेक्षकांना खात्री आहे. सृष्टी बहल या वेबसिरिजची निर्मिती करत असून या वेबसिरिजमध्ये प्रेक्षकांना एक वेगळी लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे म्हटले जात आहे. या वेबसिरिजमध्ये एक खूपच चांगला विषय हाताळण्यात आला आहे.
नीना गुप्ता देखील या वेबसिरिजमध्ये झळकणार असून वेबसिरिजमध्ये काम करण्याची नीना गुप्ता यांची ही पहिलीच वेळ आहे. यासोबतच पूजा बॅनर्जी या वेबसिरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ती या वेबसिरिजमध्ये रोनित रॉयच्या मुलीची भूमिका साकारणार आहे.
पूजाने चंद्र नंदिनी या मालिकेत काम केले होते. पूजाचे नुकतेच लग्न झाले असून तिने काही महिन्यांपासून छोट्या पडद्यावरून ब्रेक घेतला आहे. छोट्या पडद्यावर तितकेशे चांगले विषय हाताळले जात नसल्याने तिने छोट्या पडद्यापासून दूर राहाणे पसंत केले होते. पण आता ती वेबसिरिज या नव्या माध्यमात झळकणार आहे.
Also Read : नीना गुप्ता यांना का मागावे लागले सोशल मीडियावर काम? वाचा या प्रश्नाचे उत्तर!