भूमिका गुरूंगचा लूक असणार बंटी और बबलीमधील राणी मुखर्जीसारखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 13:15 IST2017-09-11T07:45:02+5:302017-09-11T13:15:02+5:30
स्टार भारतवरील आगामी मालिका निमकी मुखिया या मालिकेची संकल्पना ही सध्याच्या इतर मालिकांपेक्षा खूप वेगळी असल्याने या मालिकेची घोषणा ...
(1).jpg)
भूमिका गुरूंगचा लूक असणार बंटी और बबलीमधील राणी मुखर्जीसारखा
स टार भारतवरील आगामी मालिका निमकी मुखिया या मालिकेची संकल्पना ही सध्याच्या इतर मालिकांपेक्षा खूप वेगळी असल्याने या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच या मालिकेबाबत प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता आहे. या मालिकेत प्रेक्षकांना निमकीचा प्रवास पाहायला मिळणार आहे. निमकीच्या भूमिकेत प्रेक्षकांना भूमिका गुरूंग ही अभिनेत्री दिसणार आहे. भूमिका गुरूंगची ही पहिलीच मालिका असून ती या मालिकेसाठी खूप उत्सुक आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेवर, तिच्या रंगभूषेवर सध्या ती चांगलीच मेहनत घेत आहे.
निमकीची अवखळ आणि अल्लड व्यक्तिरेखा लक्षात घेता निर्मात्यांनी ‘बंटी और बबली’मधील राणी मुखर्जीच्या व्यक्तिरेखेप्रमाणे निमकीसाठी रंगीबेरंगी पोशाख निवडले आहेत. निमकी मुखिया या मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेली निमकी मालिकेत रंगीत पटियाला सलवार आणि कमीज परिधान करताना दिसणार आहे. तिला बॉलिवूडबद्दल अतिशय आकर्षण असल्याचे मालिकेत दाखवण्यात येणार आहे आणि त्यामुळे बॉलिवूडमध्ये नायिका बनण्याची ती सतत स्वप्नं पाहात असते. निमकी या व्यक्तिरेखेबाबत भूमिका सांगते, “एखाद्याचे व्यक्तिमत्त्व त्याच्या फॅशनच्या आवडीनिवडीबद्दल सांगत असते आणि निमकीच्या कपड्यांवरून आणि तिच्या एकूणच लूकवरून प्रेक्षकांना तिचे व्यक्तिमत्त्व लक्षात येणार आहे. निर्मात्यांनी माझ्या पोशाखासाठी खास पॅटर्न्स आणि प्रिंट्स वापरल्या आहेत. बंटी और बबलीमध्ये राणी मुखर्जीने असे कपडे परिधान केले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या फॅशनची लाट आली होती. निमकी ती फॅशनची लाट परत आणू शकेल असा मला विश्वास आहे. माझी ही पहिलीच मालिका असली तरी ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडेल याची मला खात्री आहे.”