रोहित शेट्टी, रितविक धनजानी आणि करण वाही यांची खतरो की खिलाडीच्या सेटवर जमली गट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 17:13 IST2017-06-21T11:29:03+5:302017-06-21T17:13:56+5:30
रोहित शेट्टी सध्या खतरो के खिलाडी या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकापेक्षा एक खरतनाक ...

रोहित शेट्टी, रितविक धनजानी आणि करण वाही यांची खतरो की खिलाडीच्या सेटवर जमली गट्टी
र हित शेट्टी सध्या खतरो के खिलाडी या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकापेक्षा एक खरतनाक स्टंट करत असून प्रेक्षकांना त्यांचे हे स्टंट खूपच आवडत आहेत. भयानक स्टंट करण्यासाठी प्रत्येकामध्ये खूप सारी एनर्जी असणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या फिटनेसच्या बाबतीत सगळेच स्पर्धक प्रचंड सतर्क आहेत.
खतरो के खिलाडी या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला अनेक तास जात असल्याने या कार्यक्रमातील स्पर्धकांचे अनेक तास हे चित्रीकरणातच जातात. पण तरीही सगळेच स्पर्धक या चित्रीकरणातून वेळ काढून जिममध्ये घाम गाळताना दिसतात. या कार्यक्रमातील स्पर्धक करण वाही आणि रितविक धनजानी तर काही केल्या जिममध्ये जाणे चुकवत नाही. त्यांना दोघांना जिममध्ये जाण्यासाठी आता एक खास पार्टनर मिळाला आहे.
रोहित शेट्टी देखील त्याच्या फिटनेसच्या बाबतीत अतिशय सतर्क असतो. त्यामुळे तो देखील नेहमीच यांच्यासोबत जिममध्ये जातो. करणने नुकतेच रोहित आणि रितविकसोबत डम्बल्स उचलत असल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोला खूप लाईक्स मिळत आहेत. रितविक त्याच्या जिममधील नवीन मित्राविषयी सांगतो, रोहित सर हे कार्यक्रमात अतिशय कठोर असले तरी ते इतरवेळी आमच्यासोबत एका मागदर्शकाप्रमाणे वागतात. जेव्हा स्टंट करण्याची वेळ येते तेव्हा देखील ते आम्हाला अचूक सल्ला देतात. तसेच आमच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेतात. रोहित सर खूप खोडकर देखील आहेत. ते नेहमीच आमच्या खोड्या काढत असतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व खूपच छान असून त्यांच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहे. स्पेनमध्ये त्यांच्यासोबत आम्ही खूपच चांगला वेळ घालवत आहोत.
Must read : स्टंट करताना मी कधीतरी घाबरतोः रोहित शेट्टी