या मालिकेतून रोहिणी हट्टंगडी रसिकांच्या भेटीला? जाणून घ्या त्यांच्या भूमिकेविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 12:20 IST2016-12-06T12:20:22+5:302016-12-06T12:20:22+5:30

"होणार सून मी या घरची" मालिकेत रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली आईआजी ही भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतली होती. या मालिकेतील ...

Rohini Hattangadi reception from this series? Learn about their role | या मालिकेतून रोहिणी हट्टंगडी रसिकांच्या भेटीला? जाणून घ्या त्यांच्या भूमिकेविषयी

या मालिकेतून रोहिणी हट्टंगडी रसिकांच्या भेटीला? जाणून घ्या त्यांच्या भूमिकेविषयी

"ह
ोणार सून मी या घरची" मालिकेत रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली आईआजी ही भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतली होती. या मालिकेतील सगळ्यात लोकप्रिय श्री जान्हवी आणि आईआजी यांच्यावर रसिकांनी भरभरून प्रेम केले.त्यांच्या आवडत्या कालकारांच्या प्रत्येक गोष्ट रसिकांनी डोक्यावर घेतली. मात्र इतकी लोकप्रिय असणारी या मालिकेने काही दिवसानंतर रसिकांचा निरोप घेतला.मालिकेतील शशांकने साकारलेली 'श्री' ही भूमिका आणि तेजश्री प्रधानने  साकारलेली 'जान्हवी' या भूमिकेवही भरभरून प्रेम केले.मात्र मालिका संपल्यानंतर रसिकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्याची ईच्छा होती. त्याप्रमाणे शशांकने 'इथेच टाका तंबू' या मालिकेत पुन्हा दामदार तितकीच हटके एंट्री केली. तर दुसरीकडे तेजश्रीनेही 'कार्टी काळजात घुसली'  नाटकांतून रसिकांच्या भेटीला आली.त्याचप्रमाणे आईआजी साकारणा-या रोहिनी हट्टंगडीही पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एंट्री करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.मराठी आणि हिंदी सीनेसृष्टीत, मालिकांद्वारे तसेच रंगमंचावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या अष्टपैलू अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा येत आहेत. कलर्स मराठीशी त्यांचे नात खूप जूनं आहे “चार दिवस सासू” चे या मालिकेमुळे त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या आणि सगळ्यांच्या लाडक्या झाल्या. आता तब्बल ३ वर्षांनंतर त्या पुन्हा कलर्स मराठीवरील “सख्या रे” या नवीन मालिकाद्वारे परत येत आहेत. या मालिकेमध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. रोहिणीजींसोबत या मालिकेत प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येणार आहे त्यांचा लाडका अभिनेता सुयश टिळक तसेच ज्ञानदा रामतीर्थकार या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.“सख्या रे”  या मालिकेमध्ये रोहिणीजी राजघराण्यातील मासाहेबांची भूमिका साकारणार आहेत. नावावरूनच व्यक्तिरेखा भारदस्त असणार आहे. नक्कीच त्यांच्या अभिनयाच्या साथीने हि भूमिका अजूनच वजनदार  होईल यात शंका नाही. प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून रोहिणी हट्टंगडी यांना छोट्या पडद्यावर बघण्याची जी हुरहूर होती ती आता लवकरच क्षमणार आहे. कलर्स मराठीवर “सख्या रे” हि मालिका लवकरच सुरु होणारा असून या मालिकेतील रोहिणीजींची भूमिका आणि त्यांचे नवे रूप नक्कीच प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाहि.

Web Title: Rohini Hattangadi reception from this series? Learn about their role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.