मराठी अभिनेत्रीच्या घरी चोरी, नोकरानेच केले 6 लाखांचे दागिने लंपास; पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 13:31 IST2024-01-04T13:30:02+5:302024-01-04T13:31:34+5:30

लग्नात मिळालेले दागिनेच गेले चोरीला

robbery at marathi actress Neha Pendse s bandra house jwellery stolen worth rs 6 lakhs | मराठी अभिनेत्रीच्या घरी चोरी, नोकरानेच केले 6 लाखांचे दागिने लंपास; पोलिसांनी केली अटक

मराठी अभिनेत्रीच्या घरी चोरी, नोकरानेच केले 6 लाखांचे दागिने लंपास; पोलिसांनी केली अटक

मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेच्या (Neha Pendse) बांद्रा येथील घरी चोरी झाली आहे. तिचे सहा लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. नेहाने तातडीने चोरीची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली. बांद्रा पश्चिम येथील अरेटो बिल्डींगमधील 23 व्या मजल्यावर नेहा पती शार्दुल सिंहसोबत राहते. याच घरात ही चोरी झाली असून पोलिसांनी त्यांच्या एका नोकरालाच अटक केली आहे.

नेहाचा पती शार्दुल सिंहच्या सांगण्यानुसार, की चार वर्षांपूर्वी त्यांना लग्नाच्या आहेरात मिळालेल्या सोन्याचं कडं आणि हिऱ्याची अंगठी कपाटातून गायब होती. शार्दुल बऱ्याचदा हे बाहेर घालायचा आणि घरी आल्यावर नोकरांना कपाटात ठेवायला सांगायचा. त्याने हे दागिने सुमित कुमारला दिले होते. सुमित इतर नोकरांसोबत घरातच राहतो. दागिने गायब झाल्याचं कळताच शार्दुलने सर्व नोकरांना एकत्र बोलवले. तेव्हा कोणालाच याबद्दल माहित नव्हते. सुमित तेव्हा घरी नव्हता. त्याला फोन केला असता तो कुलाबा येथे त्याच्या आत्याच्या घरी असल्याचे समजले. 

नंतर चौकशी केली असता तो म्हणाला की त्याने दागिने कपाटातच ठेवले होते. शार्दुलने सुमितला ताबडतोब घरी येण्यास सांगितले. मात्र सुमितने बराच वेळ लावला तेव्हा शार्दुलला संशय आला. यानंतर शार्दुलचा ड्रायव्हर रत्नेश झाने बांद्रा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुमितला अटक केली, मात्र चोरी झालेले दागिने अजूनही मिळालेले नाहीत. 

Web Title: robbery at marathi actress Neha Pendse s bandra house jwellery stolen worth rs 6 lakhs