रिया शर्मा दिसणार 'या' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 16:01 IST2019-02-22T15:57:32+5:302019-02-22T16:01:58+5:30

'ये रिश्ते कहलाता है!’ मालिकेवर आधारित 'ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या मालिकेबाबत उत्सुकता लागली आहे

Riya Sharma will appear in yeh rishtey hain pyaar ke serial | रिया शर्मा दिसणार 'या' मालिकेत

रिया शर्मा दिसणार 'या' मालिकेत

'ये रिश्ते कहलाता है!’ मालिकेवर आधारित 'ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या मालिकेबाबत उत्सुकता लागली आहे.'ये रिश्ते है प्यार के’ मालिकेच्या नायकाच्या भूमिकेत अभिनेता शाहीर शेख दिसणार आहेत. शाहीरच्या नावाची घोषणा झाल्यापासून या मालिकेत अभिनेत्रीची भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यावरुन आता पडद्या उठला आहे अभिनेत्रीच्या भूमिकेत रिया शर्मा दिसणार आहे. त्यांच्यासह ऋत्विक अरोरा आणि कावेरी प्रियम हेसुद्धा मुख्य भूमिेकेत दिसणार आहेत.

आता प्रेक्षकांची अतिशय आवडत्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या मालिकेच्या कथानकाला पुढे वेगळ्या वळणावर नेण्याचे काम ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेतील पुढील पिढीचे नायक करतील. जीवनाचा जोडीदार निवडण्याचे काम डोळसपणे करण्याची गरज असून त्यासाठी वेळ लागतो, ही गोष्ट हे तरूण कलाकार सिध्द करतील. 

निर्माते राजन शाही यांनी या मालिकेसाठी निवडलेले कलाकार दिग्गज असून त्यातील ताजे कथानक आणि तरूण कलाकार यामुळे ही मालिका प्रेक्षकांचे मन खिळवून ठेवील. ‘ये रिश्ते है प्यार के’ मालिकेचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ टिकून राहील.

Web Title: Riya Sharma will appear in yeh rishtey hain pyaar ke serial