‘छोटी मालकीण’ मालिकेतील रेवा-श्रीधरचा जीव धोक्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 07:15 IST2018-10-12T13:06:22+5:302018-10-13T07:15:00+5:30

छोटी मालकीण या मालिकेत आलंय धक्कादायक वळण. धामणगावात दरवर्षीप्रमाणे देवीचा उत्सव साजरा केला जातोय. अण्णासाहेब गायब झाल्यानंतर वारसदार म्हणून देवीच्या पुजेचा मान आपल्याला मिळावा यावरुन विराट आणि गावकऱ्यांमध्ये रणधुमाळी सुरु आहे.

Riva-Sridhar's life threatened by a 'choti malkin' series! | ‘छोटी मालकीण’ मालिकेतील रेवा-श्रीधरचा जीव धोक्यात!

‘छोटी मालकीण’ मालिकेतील रेवा-श्रीधरचा जीव धोक्यात!

ठळक मुद्दे विराटचा हा प्लॅन यशस्वी होणार का?


स्टार प्रवाहवरील छोटी मालकीण या मालिकेत आलंय धक्कादायक वळण. धामणगावात दरवर्षीप्रमाणे देवीचा उत्सव साजरा केला जातोय. अण्णासाहेब गायब झाल्यानंतर वारसदार म्हणून देवीच्या पुजेचा मान आपल्याला मिळावा यावरुन विराट आणि गावकऱ्यांमध्ये रणधुमाळी सुरु आहे. बऱ्याच वादावादीनंतर एकमताने गावकरी विराटऐवजी श्रीधरला देवीच्या पुजेचा मान देतात. यानिमित्ताने नव्या बदलांची नांदी धामणगावात सुरु झालीय. अण्णासाहेबांचा एकमेव वारसदार असूनही विराटला पुजेचा मान मिळाला नाही ही गोष्ट त्याच्या मनात खदखदतेय. त्यामुळे सुडाच्या आगीने पेटलेल्या विराटने देवीच्या पुजेत विघ्न आणण्याचा प्लॅन आखलाय. विराटचा हा प्लॅन यशस्वी होणार का? देवीच्या उत्सवाला संकाटाचं गालबोट लागणार का? या जीवघेण्या प्रसंगातून रेवा-श्रीधर कसे वाचणार? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं ‘छोटी मालकीण’च्या महाएपिसोडमधून मिळणार आहेत.

'छोटी मालकीण' या मालिकेत अक्षरबरोबर एताशा संझगिरी दिसतेय. आहे. एताशा 'रेवती' ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. एताशाची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेत ती डॉ. गिरीश ओक, वंदना वाकनीस, अक्षर कोठारी, निखिलराजे शिर्के, प्रदीप पंडित, प्रतीक्षा जाधव, पूजा नायक अशा अनुभवी कलाकारांबरोबर दिसतायेत. काही दिवसांपूर्वी मालिकेत अक्षरच्या आईची भूमिका साकारणाऱ्या वंदना वाकनीस यांनी अक्षरसाठी खास पिठले बनवून आणले. तर मालिकेचा प्रोडक्शन मॅनेजर विशाल मोरेनेही अक्षरसाठी पिठले आणून त्याला खास सरप्राइज दिले होते. 

Web Title: Riva-Sridhar's life threatened by a 'choti malkin' series!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.