​रितू शिवपुरी दिसणार इश्कबाजमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 12:35 IST2017-12-07T07:05:31+5:302017-12-07T12:35:31+5:30

आँखे, हम सब चोर है, आर या पार यांसारख्या चित्रपटांमध्ये रितू शिवपुरीने काम केले होते. नव्वदीच्या दशकांमध्ये अनेक चित्रपटांमध्ये ...

Ritu Shivpuri flirt appearing? | ​रितू शिवपुरी दिसणार इश्कबाजमध्ये?

​रितू शिवपुरी दिसणार इश्कबाजमध्ये?

खे, हम सब चोर है, आर या पार यांसारख्या चित्रपटांमध्ये रितू शिवपुरीने काम केले होते. नव्वदीच्या दशकांमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर रितू अभिनयापासून दूर गेली होती. अनेक वर्षांनंतर इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेद्वारे ती अभिनयक्षेत्राकडे वळली. या मालिकेतील तिची भूमिका, तिचा अभिनय या सगळ्यांचे खूप कौतुक झाले होते. या मालिकेत तिने साकारलेली इंद्राणी नारायण वशिष्ठ ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारल्यानंतर आता रितू शिवपुरी स्टार प्लसवरील इश्कबाज या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
इश्कबाज या मालिकेतील आगामी भागांमध्ये शिवाय म्हणजेच नकुल मेहता आणि अन्निका म्हणजेच सुरभी चंदना ओबेरॉय मॅन्शन सोडणार आहेत. रामायणामध्ये राम आणि सीता ज्याप्रकारे वनवासाला गेले होते, त्याचप्रमाणे हे जोडपे वनवासाला जाणार आहे. ही जोडी आपल्या घरच्यांपासून दूर जाऊन आपले आयुष्य नव्याने सुरू करणार आहे. शिवाय-अन्निका हे वनवासात गेल्यानंतर ओबेरॉय परिवारातील प्रत्येक व्यक्तिरेखा रामायणातील एक पात्र साकारणार असल्याची चर्चा आहे. या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच मालिकेत रितू शिवपुरीची एंट्री होणार आहे. रितू या मालिकेमध्येही प्रेक्षकांना खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ती या मालिकेत रावणाच्या आईची भूमिका कारणार आहे. रितू आणि तिचा मुलगा शिवाय-अन्निकाच्या नवीन आयुष्यात गोंधळ माजवणार आहेत. याविषयी रितू सांगते, “इश्कबाज या मालिकेत मी काम करते की नाही याबाबत सध्या तरी मी काहीही सांगू शकत नाही. मी काही प्रोजेक्ट्‌सबद्दल चर्चा करत आहे हे खरे असून मी लवकरच याबाबतीत माझ्या फॅन्सना सांगेन. 
रितूने २००६ साली काही मालिकांमध्ये काम केले होते. पण दिवसातील १८-२० तास चित्रीकरण करणे तिला शक्य नव्हते. या सगळ्यामुळे तिला तिच्या कुटुंबियांना वेळ देता येत नव्हता आणि त्याच्यात तिच्या नवऱ्याला ट्यूमर झाल्यामुळे ते बिछान्याला खिळले होते. त्यामुळे तिने मालिकांमध्ये काम करणे बंद केले आणि तिने त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आजारातून बाहेर काढले. 

Also Read : अपघातानेच मी अभिनयक्षेत्रात आले: रितू शिवपुरी

Web Title: Ritu Shivpuri flirt appearing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.