'तुमची सगळी नाटकं बंद!' छोटा पुढारीला रितेशने झापलं, घनःश्यामने हात जोडून मागितली माफी! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 10:16 IST2024-08-26T10:14:15+5:302024-08-26T10:16:31+5:30

छोटा पुढारीला काल रितेश भाऊंनी चांगलंच फैैलावर घेतलं. असं काय घडलं की रितेशला छोटा पुढारीचा भयंकर राग आला (bigg boss marathi 5)

riteish deshmukh angry on chota pudhari ghanashyam darode video viral bigg boss marathi 5 | 'तुमची सगळी नाटकं बंद!' छोटा पुढारीला रितेशने झापलं, घनःश्यामने हात जोडून मागितली माफी! नेमकं काय घडलं?

'तुमची सगळी नाटकं बंद!' छोटा पुढारीला रितेशने झापलं, घनःश्यामने हात जोडून मागितली माफी! नेमकं काय घडलं?

काल बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये चौथ्या आठवड्याचा भाऊचा धक्का पार पडला. या भाऊच्या धक्क्यावर रितेशने सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. जान्हवीला उद्धट वर्तनावरुन रितेशने तिला जेलमध्ये टाकलं. याशिवाय निक्की, अरबाज, वैभवलाही चांगलंच सुनावलं. पुढे कालच्या भाऊच्या धक्क्यावर मात्र एक अनपेक्षित घटना घडली. रितेश देशमुखने काल छोटा पुढारीला चांगलंच झापलं. त्यामुळे घनःश्याम चांगलाच बिथरलेला दिसला. काय झालं नेमकं आम्ही सांगतो.

छोटा पुढारीला रितेशने झापलं कारण...

घनःश्याम दरवडे अर्थात छोटा पुढारीबद्दल रितेश सुरुवातीला म्हणाला, "या घरात एका सदस्याचा आवाज दबला जातोय. तो म्हणजे घनःश्याम दरवडे." पुढे मग रितेशने छोटा पुढारीसाठी एक टास्क डिझाईन केला होता. या टास्कमध्ये घनःश्यामला नावांचे बॅज सदस्यांना लावायचे होते. 'माचिस', 'नागीन' अशी विशेषणांची चिन्हं घनःश्यामने पॅडी, धनंजय आणि अंकिता यांना दिली. पुढे जेव्हा 'चावी' हा बॅज लावायची वेळ आली तेव्हा घनःश्याम म्हणाला, "अवघड आहे". हे ऐकून रितेश चांगलाच भडकला. "बॅज लावताय की घराबाहेर येताय. आज माझा मूड म्हणजे एकदम. एकाला जेलमध्ये टाकलंच आहे. गेल्या आठवड्यात डबल एविक्शन झालं होतं. या आठवड्यातही मी ते करु शकतो." 


 


रितेशचा घनःश्यामवर राग कायम

पुढे रितेश घनःश्यामला म्हणाला, "एकतर तुम्ही घरात कुठे दिसत नाही. त्यात तुमच्यासाठी हा स्पेशल टास्क ठेवलाय. तो तुम्ही करायला नकार देताय. मी तुम्हाला एक संधी देतो. मी तुम्हाला नॉमिनेट करणार नाही पण इथून पुढे मी तुमच्याशी बोलणार नाही. तुमचा गेम, टास्क आता संपला आहे. माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेऊ नका. तुमची सर्व नाटकं आता बंद." रितेशचा  रुद्रावतार बघताच घनःश्यामच्या डोळ्यातून पाणी आलं. तो हात जोडत म्हणाला, "मला माफ करा सर. मला शिक्षा देऊ नका. बाहेर काढू नका. इथून पुढे असं नाही होणार." शेवटी रितेश रागातच "क्लोजअप काढा याचा"  असं म्हणाला.

Web Title: riteish deshmukh angry on chota pudhari ghanashyam darode video viral bigg boss marathi 5