रिहा शर्माला सध्या कोणत्याही नात्यात अडकायची इच्छा नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2017 14:41 IST2017-04-17T09:11:58+5:302017-04-17T14:41:58+5:30
रिहा शर्मा सध्या लोकप्रिय शो दिया और बाती हमचा सीक्वेल असलेली स्टार प्लसवरील नवीन मालिका तू सूरज मैं सांझ ...

रिहा शर्माला सध्या कोणत्याही नात्यात अडकायची इच्छा नाही
र हा शर्मा सध्या लोकप्रिय शो दिया और बाती हमचा सीक्वेल असलेली स्टार प्लसवरील नवीन मालिका तू सूरज मैं सांझ पियाजीमध्ये कनक राठीची भूमिका करत आहे आणि करिअरच्या ह्या टप्प्यावर तिला रिलेशनशिप नको आहे. तिच्या ऑनस्क्रीन भावाची वेद राठीची भूमिका करणाऱ्या मयांक अरोरासोबत ती डेटिंग करत असल्याच्या अफवा होत्या. पण रिहाला त्याबद्दल विचारले असता ती म्हणाली, “मयांक माझ्यासाठी मेंटॉर आहे.माझ्या करिअरच्या या टप्प्यावर मला रिलेशनशिपमध्ये अडकायचे नाहीय.सध्या माझे लक्ष माझ्या कामावर आणि तू सूरज मैं सांझ पियाजी मधील माझी व्यक्तिरेखा कनकवर केंद्रित आहे.”रिहाने यापूर्वी 'इतना करो ना मुझसे प्यार', 'ये है आशिकी', 'कहानी हमारी दिल दोस्ती दिवानेपन की',या मालिकेत वेगवेगळ्या भूमिकेत झळकली होती. मात्र रियाला 'इतना करो ना मुझे प्यार' या मालिकेने रियाला खरी लोकप्रियता मिळवून दिली.तसेच रिहा एमएस धोनी: दि अनटोल्ड स्टोरी सिनेमात झळकली होती. सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले.सध्या ती तिच्या करिअर लक्ष देत असून त्यात तिला कोणत्याच गोष्टींचा अडथळा नकोय. जेव्हा तिला वाटेल की हा तिचा जोडीदार तिला योग्य आहे अशाच जोडीदारासह ती लग्नबंधनात अडकणार. तसेच उगाच रिलेशनशीपमध्ये अडकत पब्लिसिटी मिळवणारे अनेक अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये आहे.मलाही त्यांच्या यादीत मोडायचे नसून मला माझी योग्यरीतीने ओळख निर्माण करायची आहे. सध्या मिळालेली संधीचे सोने करण्यातच माझा कल असल्याने मी कोणासह रिलेशनशीपमध्ये अडकण्याचा विचारही करू शकत नाहीय,आधी करिअर त्यानंतर या गोष्टींसाठी पूर्ण आयुष्य असल्याचे तिने म्हटले आहे.