'सिद्धीविनायक'मध्ये शार्दुल पंडित साकारणार रिद्धीच्या पतीची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 15:45 IST2018-06-06T10:15:38+5:302018-06-06T15:45:38+5:30
'सिद्धीविनायक' या मालिकेने आपल्या उत्कट द्वेषकथेसह रसिकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेची कथा हिंदी चित्रपटसृष्टीच्या पार्श्वभूमीवर घडते. आजवर या ...

'सिद्धीविनायक'मध्ये शार्दुल पंडित साकारणार रिद्धीच्या पतीची भूमिका
' ;सिद्धीविनायक' या मालिकेने आपल्या उत्कट द्वेषकथेसह रसिकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेची कथा हिंदी चित्रपटसृष्टीच्या पार्श्वभूमीवर घडते. आजवर या मालिकेतील विविध ट्विस्ट्स-टर्न्समुळे प्रेक्षक मालिकेकडे आकर्षून गेले आहेत.मालिकेमध्ये लवकरच एक मोठा बदल दिसणार आहे. हा बदल विनायक (नितीन गोस्वामी) व रिद्धी (फरनाज शेट्टी) यांच्यामध्ये सुरू असलेल्या प्रेमकथेमध्ये नवीन वादळ निर्माण करणार आहे. यापूर्वी 'कुलदिपक' मालिकेमध्ये दिसलेला लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता आणि सुत्रसंचालक शार्दुल पंडित याला मालिकेत सामील करून पटकथा अधिक रंजक करण्यात आली आहे.शार्दुल रिद्धीचा पती शिवम सेनची भूमिका साकारणार आहे.शिवम हा कॉर्पोरेट वकील आहे, जो उच्चभ्रू क्लायण्ट्सच्या केसेस हाताळतो.तो अत्यंत सभ्य असून त्याचे आचरण देखील चांगले आहे. तो त्याची मुलगी जुहीवर जिवापार प्रेम करतो. तो स्वभावाने अत्यंत शांत असलेला मात्र खंबीर माणूस आहे. पण प्रेमाच्या बाबतीत विशेषत: त्याची मृत पत्नी रिद्धीच्या बाबतीत तो भावनिक व कमकुवत होऊन जातो.मालिकेमधील त्याच्या प्रवेशाने विनायक-रिद्धीच्या जीवनात नवीन वादळ निर्माण होते. त्याला रिद्धी जिवंत असल्याचे समजते आणि तो जुहीसाठी तिला परत घरी आणण्याचे ठरवतो.
'सिद्धीविनायक' मालिकेमधील आपल्या प्रवेशाबाबत बोलताना शार्दुल म्हणाला, ''मला &TV वर पुन्हा परतल्याने खूप आनंद झाला आहे. मालिकेमध्ये अनेक रोचक बदल होत असताना माझा प्रवेश अगदी योग्यवेळी झाला आहे. माझी भूमिका 'शिवम' विनायक व रिद्धी यांच्यामध्ये सुरू असलेल्या प्रेमकथेला नवीन वळण देणार आहे. तो गतळाकातील घटनेला समोर आणणार आहे. वकील असल्यामुळे तो कडक वृत्तीचा असण्यासोबतच त्याचे व्यक्तिमत्त्व देखील काहीसे गंभीर व्यक्तीचे आहे. त्याच्यासमोर रिद्धी येते तेव्हा त्याचे गंभीर व्यक्तिमत्त्व व राग दिसून येतो. तो तिला परत मिळवण्याचे ठरवतो. मी आशा करतो की प्रेक्षकांना माझी नवीन भूमिका आवडेल आणि त्यांना माझ्या अभिनयाची नवीन बाजू पाहायला मिळेल.''
सिद्धीविनायकमधील फरनाझ शेट्टी ऊर्फ रिद्धीलाही नुकतेच शूटवरून परत जात असताना अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले.मात्र,तिच्या पाठी लागलेल्या माणसाशी तिने घाबरून न जाता धैर्याने सामना केला आणि त्याला पळवून लावले होते.