क्रांती रेडकरचे ट्रकभर स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2016 13:16 IST2016-04-30T07:46:15+5:302016-04-30T13:16:15+5:30

पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत येणारा प्रत्येकजण आपल्या सोबत स्वप्न बाळगून येत असतो. जमिनीवर राहताना आकाशात उंच भरारी मारण्याची स्वप्ने ...

Revolution Redkare's Dream in a Truck | क्रांती रेडकरचे ट्रकभर स्वप्न

क्रांती रेडकरचे ट्रकभर स्वप्न

टाची खळगी भरण्यासाठी मुंबईत येणारा प्रत्येकजण आपल्या सोबत स्वप्न बाळगून येत असतो. जमिनीवर राहताना आकाशात उंच भरारी मारण्याची स्वप्ने पाहणाºया तुमच्या आमच्यासारख्या प्रत्येक मुंबईकरांच्या भावनांचा वेध घेणारा प्रमोद पवार दिग्दर्शित ट्रकभर स्वप्न या चित्रपटाचा नुकताच मुहर्त करण्यात आला. तसेच या चित्रपटाची निर्मिती नितीन देसाई यांनी केली आहे. यापूर्वी त्यांनी बालगंधर्व, जयहिंद अजिंठा यासारखे सुपरहिट चित्रपट देखील त्यांनी मराठी इंडस्ट्रीला दिले आहे. तसेच त्यांनी निर्मिती केलेल्या ट्रकभर स्वप्न या आगामी चित्रपटात मकरंद देशपांडे आणि क्रांती रेडकर हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर याव्यतिरिक्त अदिती पोहोनकर, मुकेश रिशी, यतीन कारेकर, स्मिता तांबे, सुरेश भागवत या कलाकरांचादेखील या चित्रपटात समावेश आहे.  याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना क्रांती रेडकर म्हणाली, या चित्रपटात मकरंद देशपांडे या तगडया कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्याकडे कित्येक वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे काम करताना ते कामातील छोट-छोटे बारकावे काढतात. त्यामुळे हे जे बारकावे आहेत ते आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखे आहे.तसेच त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. 
























Web Title: Revolution Redkare's Dream in a Truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.