तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये राज अनादकत बनला नवा टप्पू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 12:58 IST2017-03-03T05:10:58+5:302017-03-09T12:58:13+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भाव्या गांधीने नुकतीच ही मालिका सोडली. टप्पू ही व्यक्तिरेखा ...

In the reverse side of Tarak Mehta, the state became unstoppable | तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये राज अनादकत बनला नवा टप्पू

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये राज अनादकत बनला नवा टप्पू

ref="http://cnxmasti.lokmat.com/television/hot-gossip/bhavya-gandhi-left-tarak-mehta-ka-oolta-chasma-for-his-new-gujrati-movie/18465">तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भाव्या गांधीने नुकतीच ही मालिका सोडली. टप्पू ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांची प्रचंड लाडकी असून भाव्या गेली आठ वर्षं ही भूमिका साकारत आहे. त्याने ही मालिका सोडल्यानंतर आता त्याची जागा कोण घेणार हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. टप्पू या व्यक्तिरेखेसाठी अनेक ऑडिशन घेतली गेली होती. आता या मालिकेत राज अनादकत टप्पूची भूमिका साकारणार आहे. 
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत टप्पू ही भूमिका एक महत्त्वाची भूमिका मानली जाते. इतकी चांगली भूमिका साकारायला मिळत असल्याने सध्या राज चांगलाच आनंदित आहे. याविषयी राज सांगतो, "मी ही मालिका खूप सुरुवातीपासून पाहिली आहे. टप्पूच्या लहानपणापासून ते टप्पूचा कॉलेज जाण्यापर्यंतचा प्रवास मी पाहिला आहे. ही भूमिका अतिशय सशक्त आणि सकारात्मक असल्याने ही भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला ही भूमिका साकारायची संधी दिल्याबद्दल मी या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांचा आभारी आहे. 
टप्पू या मालिकेत कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना पाहायला मिळत नाहीये. आता टप्पूच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची मालिकेत रिएंट्री होणार आहे. 
टप्पूच्या वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण गोकुळधाम सोसायटीला सजवण्यात येणार आहे आणि या सगळ्याचे मोठाले बिल जेठालालला भरावे लागणार आहे आणि पार्टीमध्ये नव्या टप्पूची धुवाँधार एंट्री होणार आहे. टप्पू हा टप्पू सेनाचा नेता आहे आणि त्यामुळे आपला नेता कित्येक दिवसांनंतर परत आल्यामुळे ते खूप खूश आहेत. 

Web Title: In the reverse side of Tarak Mehta, the state became unstoppable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.