पती आशुतोष राणाबरोबर रेणुका शहाणे एकाच मालिकेत येणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 17:16 IST2019-02-28T17:09:04+5:302019-02-28T17:16:09+5:30

दिल्ली असो की मुंबई, किंवा असो देशातला कोणताही भाग आता गुन्हेगारांची काही खैर नाही. कारण गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्यासाठी आले आहेत अभिनेता आशुतोष राणा.

Renuka Sahane to host a show with Ashutosh Rana ? | पती आशुतोष राणाबरोबर रेणुका शहाणे एकाच मालिकेत येणार एकत्र

पती आशुतोष राणाबरोबर रेणुका शहाणे एकाच मालिकेत येणार एकत्र

आपल्या भोवती घडणार्‍्या गुन्ह्यांच्या घटनांचे निवेदन आणि चित्रीकरण करून प्रेक्षकांना त्याबाबत जागृत आणि सतर्क करणारा  ‘सावधान इंडिया’ हा ‘स्टार भारत’वरील लोकप्रिय कार्यक्रम हा देशातील सर्वाधिक काळ चाललेला टीव्ही कार्यक्रम (मालिका) आहे. दिल्ली असो की मुंबई, किंवा असो देशातला कोणताही भाग आता गुन्हेगारांची काही खैर नाही. कारण गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्यासाठी आले आहेत अभिनेता आशुतोष राणा.आशुतोष राणा गेले दोन महिने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असून आपल्या भारदस्त व्यक्तिरेखेमुळे त्याने प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली आहे. प्रेक्षकांना सामाजिक संदेश देणा-या कार्यक्रमात आशुतोष राणा प्रथमच सुत्रसंचालन करत आहेत.

आपला अभिनय आणि कुणालाही घायाळ करेल असं चेह-यावरील स्मित हास्य यामुळे मराठीसह हिंदी रसिकांवर जादू करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे.लवकरच रेणुकाही या शोच्या एका भागात झळकणार आहे.एका टेलिफोन कॉलमुळे एका आनंदी कुटुंबाचे जीवन कसे उद्ध्वस्त होते, त्याची कथा या भागात सादर करण्यात आली आहे. या कथेमुळे हे दाम्पत्य खूपच प्रभावित झाले असून त्यामुळेच या भागात ते आपले काही वैयक्तिक अनुभवही सांगतील, असे सांगितले जात आहे.

या शोच्या पूर्वीचे भागाचे सूत्रसंचालन अभिनेता सुशांत सिंहने केले होते. आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि ‘सावधान इंडिया’सारख्या गुन्हेगारीविषयक मालिकेचे सूत्रसंचालन करण्यामुळे तो प्रसिध्द आहे. सुशांत सिंह गेली सहा वर्षे ‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.
 

Web Title: Renuka Sahane to host a show with Ashutosh Rana ?