रेमो डिसुझाने 'ह्या' चित्रपटाचे चित्रीकरण टाकले लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 15:22 IST2018-09-27T15:21:48+5:302018-09-27T15:22:51+5:30
'डान्स प्लस'चा चौथा सीझन लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे.

रेमो डिसुझाने 'ह्या' चित्रपटाचे चित्रीकरण टाकले लांबणीवर
स्टार प्लसवरील 'डान्स प्लस' या नृत्यविषयक रिएलिटी कार्यक्रमाने गेल्या काही वर्षांत देशाला काही उत्कृष्ट नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक दिले आहेत. या कार्यक्रमात सर्वोच्च परीक्षकाच्या रूपात रेमो डिसुझा याच्यासारखा आघाडीचा अग्रगण्य नृत्यदिग्दर्शक काम बघत असेल, तेव्हा या कार्यक्रमातील नृत्याचा स्तर निश्चितच अतिशय उच्च असेल, याची सर्वांना खात्रीच असते. आता 'डान्स प्लस'चा चौथा सीझन लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे.
रेमो जे काम स्वीकारतो, त्यात तो आपले सर्वस्व देतो. चित्रपटाचे दिग्दर्शन असो की नृत्यदिग्दर्शन किंवा रिएलिटी कार्यक्रमात नर्तकांचे मूल्यमापन करणे असो रेमोने आतापर्यंत आघाडीचा परीक्षक म्हणून नाव संपादन केले आहे. आता डान्स प्लस कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीत त्याची सुपर जज म्हणून नियुक्ती करण्याविषयी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने आपल्याच चित्रपटाचे चित्रीकरण लांबणीवर टाकले. रेमोच्या दृष्टीने डान्स प्लस या कार्यक्रमास सर्वोच्च प्राधान्य
असून त्यासाठी त्याने वरूण धवन आणि कत्रिना कैफ यांच्या भूमिका असलेल्या आपल्याच 'एबीसीडी-3' या चित्रपटाचे चित्रीकरण लांबणीवर टाकले आहे. यावरून त्याची या कार्यक्रमाविषयी असलेली कटिबध्दता दिसून येते. 'डान्स प्लस ४' लवकरच स्टार प्लसवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.