सलमान खानसोबतच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात करणारः रेमो डिझोझा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 17:08 IST2017-09-09T11:38:08+5:302017-09-09T17:08:08+5:30

रेमो डिझोझाच्या डान्स प्लस या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या कार्यक्रमानंतर आता रेमोचा डान्सशी निगडित डान्स चॅम्पियन्स ...

Remembrance shooting with Salman Khan will start soon: Remo Dizjo | सलमान खानसोबतच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात करणारः रेमो डिझोझा

सलमान खानसोबतच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात करणारः रेमो डिझोझा

मो डिझोझाच्या डान्स प्लस या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या कार्यक्रमानंतर आता रेमोचा डान्सशी निगडित डान्स चॅम्पियन्स हा आणखी एक कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

डान्स प्लस या कार्यक्रमानंतर लगेचच डान्स चॅम्पियन्स हा कार्यक्रम तू घेऊन येत आहेस, याचे कारण काय?
डान्स प्लस हा कार्यक्रम प्रेक्षकांना खूप आवडतो. पण या कार्यक्रमाचा पुढचा सिझन येण्यासाठी प्रेक्षकांना एक वर्षं तरी वाट पाहावी लागते. त्यामुळे प्रेक्षक आमच्या या कार्यक्रमाला खूप मिस करतात. तसेच या वेळेचा सिझन खूपच लवकर संपत आहे असे या कार्यक्रमाच्या फॅन्सचे म्हणणे आहे. त्यामुळे नृत्यावर आधारित आणखी एक कार्यक्रम आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचे ठरवले.

डान्स चॅम्पियन्स या कार्यक्रमाचे कॉन्सेप्ट काय असणार?
या कार्यक्रमात डान्स प्लस, नच बलिये, झलक दिखला जा, डान्स इंडिया डान्स या आतापर्यंतच्या सगळ्या प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शोमधील विजेते आणि उपविजेते डान्स चॅम्पियन्स होण्यासाठी एकमेकांना आव्हान देणार आहेत. त्यामुळे एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत.

डान्स प्लसच्या टीममधील कोण कोण डान्स चॅम्पियन्सचा भाग असणार आहेत?
डान्स चॅम्पियन्समध्ये मी परीक्षकाच्या भूमिकेत झळकणार आहे तर राघव जुयल या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक असणार आहे. तसेच पुनित या कार्यक्रमातील सगळ्या नृत्यांची कोरिओग्राफी करणार आहे.

डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमात झळकलेल्या अनेक स्पर्धकांना तू अनेक चांगल्या संधी दिल्या आहेस, याविषयी काय सांगशील?
डान्स इंडिया डान्स हा कार्यक्रमाचे परीक्षण करत असताना या सगळ्यांमध्ये किती टायलेंट आहे याची मला जाणीव झाली होती आणि त्याचमुळे मी या मुलांना भविष्यात माझ्या कार्यक्रमात संधी दिली. अनेकवेळा रिअॅलिटी शोमध्ये झळकलेले स्पर्धक नंतर गायब होतात. पण आज डान्स इंडिया डान्समधील अनेक स्पर्धक माझ्यासोबत काम करत आहेत आणि ते प्रचंड मेहनती देखील आहेत. त्यामुळेच त्यांना आजवर इतके यश मिळाले आहे.

सलमान खानसोबतच्या तुझ्या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे, या चित्रपटाच्या चित्रीकरणाला कधी सुरुवात होणार आहे?
सलमान खान सध्या अबुधाबीमध्ये त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तो तिथून परतल्यानंतर आम्ही तारखांबाबत चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर आमच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. 

Also Read : या व्यक्तींमुळे घडला धर्मेश सर

Web Title: Remembrance shooting with Salman Khan will start soon: Remo Dizjo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.