/> प्रत्येक कलाकाराच्या त्याचा चित्रपटांच्या दरम्यानच्या आठवणी कायम लक्षात राहतात. सेट वरची ती धमाल मस्ती, मजा, कामाचा स्ट्रेस अन त्यातुन वेळ काढुन टिमसोबत केलेली एंजॉयमेंट मनात कायम घर करुन जाते. अशाच आठवणीत आपली चुलबुली गर्ल प्रिया बापट सध्या रमली आहे. प्रियाला आठवतोय तिचा टाईमप्लीज हा सिनेमा. या सिनेमामध्ये ती उमेश कामत याच्या सोबत पडद्यावर जरी झळकली असली तरी यामध्ये सिद्धार्थ जाधव देखील तिच्या बेस्ट फ्रेन्डच्या भुमिकेत दिसला होता. चित्रपटात देखील या दोघांची केमिस्ट्री खुपच मस्त रंगलेली होती. मग बॅकस्टेज तर यांनी नक्कीच धमाल केली असणार यात शंकाच नाही. आणि म्हणुनच प्रियाच्या या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. प्रियाने सिद्धार्थ सोबतचा एक फोटो सोशल साईटवर अपलोड केला असुन ती त्याला विचारतीये सिद्धु डु यु रिमेंबर धिस मोमेंट.