मालगुडी डेज मधील स्वामीला आता ओळखणे देखील होतंय कठीण, अभिनय सोडून करतोय हे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 06:00 IST2020-01-02T06:00:00+5:302020-01-02T06:00:02+5:30

'Malgudi Days' Series : आता मंजुनाथ अभिनयक्षेत्रापासून दूर असून एका वेगळ्याच क्षेत्रात त्याने त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे.

Remember Swami from 'Malgudi Days'? This is how he looks like now | मालगुडी डेज मधील स्वामीला आता ओळखणे देखील होतंय कठीण, अभिनय सोडून करतोय हे काम

मालगुडी डेज मधील स्वामीला आता ओळखणे देखील होतंय कठीण, अभिनय सोडून करतोय हे काम

ठळक मुद्देमालगुडी डेजचे सगळेच चित्रीकरण हे कर्नाटकमध्ये झाले आहे. मंजुनाथ देखील मुळचा कर्नाटकमधील असून त्याचे शिक्षण हे बंगलूरूमध्ये झाले. शिक्षण संपल्यानंतर तो काही वर्षं एका आयटी फर्ममध्ये काम करत होता.

नव्वदच्या दशकात मालगुडी डेज ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या होत्या. या मालिकेत चिमुकल्या स्वामीची भूमिका तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या मालिकेत स्वामीच्या भूमिकेत आपल्याला मंजुनाथ नायकरला पाहायला मिळाले होते.


या मालिकेप्रमाणेच मंजुनाथ अग्निपथ या चित्रपटात झळकला होता. या प्रसिद्ध चित्रपटात त्याने अमिताभ बच्चन यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती तसेच त्याने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. पण आता मंजुनाथ अभिनयक्षेत्रापासून दूर असून एका वेगळ्याच क्षेत्रात त्याने त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे.


मालगुडी डेजचे सगळेच चित्रीकरण हे कर्नाटकमध्ये झाले आहे. मंजुनाथ देखील मुळचा कर्नाटकमधील असून त्याचे शिक्षण हे बंगलूरूमध्ये झाले. शिक्षण संपल्यानंतर तो काही वर्षं एका आयटी फर्ममध्ये काम करत होता. तसेच त्याने पीआर म्हणून देखील काम केले आहे. आता तो सिनेमेटॉग्राफर म्हणून काम करतो. तसेच तो एका कंपनीचा व्हाईस प्रेसिडंट आहे. 

मंजुनाथचे लग्न झाले असून त्याच्या पत्नीचे नाव स्वर्णलेखा आहे. त्याच्या लग्नाला अनेक वर्षं झाले असून त्यांना एक मुलगा देखील आहे. त्याच्या ट्विटर अकाऊंटला आपल्याला मालगुडी डेट मालिकेतील अनेक फोटो पाहायला मिळतात. तसेच या मालिकेत स्वामीसोबतच राजम आणि मणी महत्त्वाच्या भूमिकेत होते. ते तिघे काही वर्षांपूर्वी एका रेडिओ कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यावेळेचा फोटोदेखील आपल्याला त्याच्या ट्विटरच्या अकाऊंटवर पाहायला मिळतो. 



 

Web Title: Remember Swami from 'Malgudi Days'? This is how he looks like now