'भाभीजी घर पर है' मालिकेत 'मुघल-ए-आझम'चा रिमेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 16:10 IST2017-02-18T10:40:38+5:302017-02-18T16:10:38+5:30
'इंग्रज निघून गेले,पण जाताना यांना सोडून गेले हे वाक्य भारतीयाने एकदा तरी आयुष्यात म्हटले असेल.भाभाजी घर पर है या ...

'भाभीजी घर पर है' मालिकेत 'मुघल-ए-आझम'चा रिमेक
' ;इंग्रज निघून गेले,पण जाताना यांना सोडून गेले हे वाक्य भारतीयाने एकदा तरी आयुष्यात म्हटले असेल.भाभाजी घर पर है या मालिका आता अशाच काही वेगळ्या वळणावर वळताना दिसणार आहे.कारण मालिकेच्या आगामी भागात अशाच एखा परदेशी पाहुण्याचे आगमन होणार आहे.सक्सेनाचा लंडनमधील मित्र टकवर्ड लुईस या नवीन कॅरेक्टरची मालिकेत एंट्री होणार आहे.या पाहुण्याची एक खासियत आहे. भारतात तो एक स्वप्न घेवून येतो.मुघल-ए आजम हा सिनेमा नव्याने बनवत तो लंडनमध्ये प्रदर्शित करायाचा आहे.या सिनेमाच्या कलाकरांच्या शोधात तो मुंबईत दाखल होतो.
ही गोष्ट ऐकल्यानंतर मोहल्यातील सगळेच मंडळी या सिनेमात भूमिका साकारायला मिळावी यासाठी खूप मेहनत घेताना दिसतात.प्रत्येक जण आपल्याला भूमिकेच्या विचारात मग्न होताना दिसतात.विभुतीने मात्र अंगुरी भाभीनेच अनारकलीची भूमिका साकारावी यासाठी तिला गळ घालतो.कारण त्याला अंगुरी भाभीसह सलीमची भूमिका साकारण्याची इच्छा असते.तर दुसरीकडे तिवारी स्वतः अकबराची भूमिका साकारणा असल्यामुळे तो अनिता भाभीला जोधा बनवण्यासाठी तयार करतो.इतरही सगळे यांत सामील होत धम्माल विनोद करताना दिसतील.याविषयी विभूती नारायणची भूमिका साकारणारा आसिफ शेख म्हणाला,आम्ही या आगामी भागात मुघल-ए-आझम चा छोटा रिमेक सादर करणार आहोत.या भागाचे शूटिंग करताना आम्ही खूप धमाल मस्ती करत या शूटिंग पूर्ण केले.हा सगळा थाट आम्ही फक्त डकवर्डला खूश करण्यासाठी करणार आहोत. त्यानंतर तो आम्हाला त्याच्या सिनेमात घेईल आणि त्याच्यासोबत आम्हीही जगभरात भ्रंमती करू या हेतूनेच आम्ही मुघल-ए-आझम आमच्या खास अंदाजात सादर करू. या मोहल्यातील लोकांसाठी कधीही काहीही इतके साधे सरळ नसते.हे आतापर्यंत रसिकांनीही अनुभवेले आहे.यावेळीही ते एका व्टिस्ट मधून एक धडा शिकायला मिळणार आहे.त्यामुळे आगामी भागात या मोहल्यातील लोकांना आनंदाची बातमी देणार की मोठा धक्का देणार हे लवकरच स्पष्ट होणार असल्याचे आसिफने सांगितले.