"सिनेमा रिलीज करणं म्हणजे पोरीचं लग्न लावण्यासारखं आहे...", कुशल बद्रिकेची 'येरे येरे पैसा ३'साठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:11 IST2025-07-16T15:11:01+5:302025-07-16T15:11:48+5:30

Kushal Badrike : कुशल बद्रिके नुकताच 'येरे येरे पैसा ३' सिनेमाच्या प्रीमियरला गेला होता. त्यावेळचे फोटो शेअर करत त्याने सिनेमासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

''Releasing a movie is like getting a child married...'', Kushal Badrike's special post for 'Yere Yere Paisa 3' | "सिनेमा रिलीज करणं म्हणजे पोरीचं लग्न लावण्यासारखं आहे...", कुशल बद्रिकेची 'येरे येरे पैसा ३'साठी खास पोस्ट

"सिनेमा रिलीज करणं म्हणजे पोरीचं लग्न लावण्यासारखं आहे...", कुशल बद्रिकेची 'येरे येरे पैसा ३'साठी खास पोस्ट

अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तो 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya)च्या नवीन सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे. या शो संदर्भात तो प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर देत असतो. दरम्यान आता त्याने सोशल मीडियावर 'येरे येरे पैसा ३' (Yere Yere Paisa 3 Movie) सिनेमासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

कुशल बद्रिके नुकताच 'येरे येरे पैसा ३' सिनेमाच्या प्रीमियरला गेला होता. त्यावेळचे फोटो शेअर करत त्याने लिहिले की, ''एक सिनेमा रिलीज करणे म्हणजे पोरीचं लग्न लाऊन देण्या सारखं आहे. म्हणजे कसं, मुलीला चांगलं शिकवायचं, छान संस्कार करायचे आणि वयात आली, की एखादा मुहूर्त बघून लावून द्यायचं लग्न, आता प्रेक्षक म्हणून सासरची माणसं ठरवणार तिचं भवितव्य! हां आता काही मुली लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये ओटीटीवर रहातात, पण संजय जाधवांची कन्या ची. सौ. का. “येरे येरे पैसा”. रीतसर लग्न करून थिएटरचा उंबरा ओलांडून तुमच्या कडे येते. तिला नांदवा ही विनंती.''


त्याने पुढे म्हटले की, ''माझं नातं प्रेक्षक म्हणून मुलीच्या सासरकडूनही आहे आणि एक कलाकार म्हणून माहेरकडूनही आहे. म्हणून हक्काने सांगतो, मुलीवर छान संस्कार झाले आहेत. आता तुमच्या शुभ-आशीर्वादांची गरज आहे. बाकी कार्यसिद्धीस श्री आणि AVK समर्थ आहेत. आमच्या दादाच्या सिनेमाला यायचं हां! तेजस्विनी पंडित. सिद्धार्थ जाधव. उमेश कामत. संजय नार्वेकर. नागेश भोसले. आनंद इंगळे. विशाखा सुभेदार. सोनाली खरे-बिजय आनंद. वनिता खरात. मीरा जगन्नाथ. जयवंत वाडकर. ईशान खोपकर. समस्त येरे येरे पैसा ३ परिवार आपलं स्वागत करीत आहेत!'' 

Web Title: ''Releasing a movie is like getting a child married...'', Kushal Badrike's special post for 'Yere Yere Paisa 3'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.