नातेसंबंध उलगडणारी दुहेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 18:58 IST2016-05-27T13:27:32+5:302016-05-27T18:58:23+5:30
आजकालच्या धावपळीच्या युगात माणसे आपली नाती-गोती कुठेतरी मागे टाकत चालत असल्याचे दिसत आहे. पण या नात्यांना सांभाळून कसे ठेवायचे, ...
.jpg)
नातेसंबंध उलगडणारी दुहेरी
आ कालच्या धावपळीच्या युगात माणसे आपली नाती-गोती कुठेतरी मागे टाकत चालत असल्याचे दिसत आहे. पण या नात्यांना सांभाळून कसे ठेवायचे, त्यांना कसे जपायचे हे नेहमीच मालिकेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. हाच प्रयत्न स्टार प्रवाह वाहिनीदेखील दुहेरी नावाच्या मालिकेच्या माध्यमातून समाजापुढे ठेवत आहे. या मालिकेतून एक बहिण आपल्या दुसºया बहिणीवर आलेल्या संकटावर मात करत स्वत:ची ओळख विसरून कसे दुहेरी आयुष्य जगते याविषयी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर लोकमत सीएनएक्सशी संवाद साधताना.
१. या मालिकेतील तुझ्या भूमिकेबद्दल सांग?
- या मालिकेत मी मैथिली झुंजारची भूमिका साकारली आहे. यामध्ये तिच्यावर आई-वडिलांच्या मायेचे छत नसते. फक्त एक बहिण असते. ही बहिणच तिचे आयुष्य असते. बहिणीवर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी तिच्या प्रेमापोटी मैथिली आपली ओळख बदलून एक वेगळचं आयुष्य म्हणजेच दुहेरी आयुष्य जगायला सुरूवात करते.
२. या जबरदस्त भूमिकेसाठी तुला काही विशेष तयारी करावी लागली का?
- मी आजगायत असा रोल कधीच केला नाही. मैथिलीची खूप चॅलेजिंग अशी भूमिका आहे. प्रत्येक सीन हा एक्सायटिंग व थ्रिलिंग आहे. तसेच या मालिकेत असे काही क्षण आहेत जे मी रिअल लाइफमध्ये देखील फेस केले नाहीत. ते प्रसंग समजून घेऊन करणे खूप अवघड आहे.
३. तू हिंदी मालिकेत काम करते, तर हिंदी आणि मराठी मालिकेत काही फरक जाणवला?
- फारसा असा फरक जाणविला नाही. पण हिंदी मालिकेचा फार मोठा रिच आहे. आम्हाला तर हिंदीत मालिकेसाठी परेदशात देखील प्रेक्षक वर्ग आहे. तसेच त्याचे बजेट देखील मोेठे असतात. बिग बजेटने ऐश्वर्य दाखविता येणे सोपे आहे. पण त्याला खरं डोकं लावून वेळेच्या मर्यादेत व बजेटमध्ये इतक्या कमाल लेवलचा कन्टेन्ट मराठीत दाखविता येतो. कारण कन्टेन्टनुसार आपण हिंदी मालिकेच्या तुलनेत खूप रीच आहोत असे नेहमीच जाणविते.
४. मराठी इंडस्ट्रीचे तगडे दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासोबत काम करताना कसे वाटले?
- मला पण संजय सरांसोबत काम करायचं होतं. त्या गर्ल्स लिस्टमध्ये माझं ही नाव असावं मला नेहमी वाटायचं. सिनेमा, मालिका, जाहिरात जे या पैकी कोणत्याही क्षेत्रात त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. दुसर कारण म्हणजे इतक ग्लॅमर, यश, प्रतिष्ठा,मोठ नाव, मोठ पद असलेली व्यक्ती ही तेवढाच मोठा प्रेशर देऊन काम करून घेत असेल पण ते पूर्ण शून्य निघाले. तसेच कलाकारांना इतक सांभाळतात की, एका प्रोटयेकटिव्ह फादर असल्यासारखे वाटते.
५: या क्षेत्रातील ग्लॅमर, पैसा,प्रसिद्धी काही काळापुरतीच असते, मग या सर्व गोष्टींकडे तू कशी पाहते?
- खरं तर अॅक्टरला अॅक्टीग सोडून ही त्याला वेगळा छंद असला पाहिजे. हे नसरूद्दीन शहाचं वाक्य मला खूप भावतं या गोष्टींकडे पाहताना. तसेच नवीन कलाकारांशी चित्रपटाव्यतिरिक्त वेगळं काही बोलायला गेलं तर त्यांना काहीच बोलता येत नाही. र्दुदैवाने काहीच वाचल जात नाही. जगलं जात नाही. त्यामुळे स्वत:ला जपयाचं असेल तर ग्लॅमरचा विचार करता कलाकाराला दुहेरी आयुष्य देखील जगायला आलं गेलं पाहिजे. आणि ती गोष्ट सुदैवाने आहे माझ्याजवळ.
६. खºया आयुष्यात असा काही अनुभव की, तुला मैथिलीसारखं दुहेरी आयुष्य धारण करावं लागलं?
- शिव्या देऊन भांडण करणे इतके गटस माझ्यात तर नाही. पण असं म्हणतात की, आपण ज्यांच्यावर खूप करतो त्यांच्याबाबतीत खूप प्रोटेकटिव्ह असतो. असाच एक प्रसंग माझ्यासोबत घडला होता. पुण्यातच माझे वडील गाडी चालवत असताना अचानक गाडी बंद पडली. आणि एक गाडीवाला येऊन धडकला. काहीही चूक नसताना तो शिवीगाळ करू लागला. पण मीच काच खाली घेऊन त्याची कॉलर पकडली. मलाच विश्वास बसला नाही की, इतकं बळ अचानक कुठून आलं. पण जेव्हा आपल्या नात्यांवर अशी वेळ येते ना त्यावेळी पॉसिबल नसताना ही आपण दुहेरी आयुष्य जगत असतो.