अशाप्रकारे करा कौन बनेगा करोडपतीसाठी रजिस्ट्रेशन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:44 IST2018-04-03T09:14:48+5:302018-04-03T14:44:48+5:30
हॉट सीटवर आहे फक्त शहेनशहाचे राज्य... शहेनशहा.. अर्थात बिग बी अमिताभ बच्चन.... ज्ञान हेच तुम्हाला पैसा मिळवून देऊ शकतो ...

अशाप्रकारे करा कौन बनेगा करोडपतीसाठी रजिस्ट्रेशन...
ह ट सीटवर आहे फक्त शहेनशहाचे राज्य... शहेनशहा.. अर्थात बिग बी अमिताभ बच्चन.... ज्ञान हेच तुम्हाला पैसा मिळवून देऊ शकतो ही थीम घेऊन यंदाही केबीसीच्या सेटवर रंगणार आहे प्रश्न उत्तरांचा रंगमंच. रसिकांचा सगळ्यात फेव्हरेट शो ‘कौन बनेगा करोडपती’चे दहावे पर्व लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या दहाव्या सिझनची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. हा कार्यक्रम सुरू होण्याआधी घरी बसून तुम्ही योग्य उत्तर देऊन एक लाख रुपये जिंकू शकणार आहात.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा दहावा सिझन ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सुरू होणार असल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमासाठी ऑडिशन्स लवकरच सुरू होणार असून तोपर्यंत प्रेक्षकांना घरबसल्या लखपती व्हायची संधी हा कार्यक्रम देत आहे. घरबसल्या एक लाख रुपये कमवण्यासाठी kbc-sonyliv.in या वेबसाईटवर जाऊन Ghar Baithe Jeeto Jackpot या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, इमेल आयडी, फोन नंबर, तुमचे ठिकाण यांसारख्या गोष्टी भराव्या लागतील. तसेच कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर बसण्यासाठी देखील याच वेबसाईटला जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.
अमिताभ बच्चन यांनी रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपतीच्या माध्यामाने साऱ्यांचे तुफान मनोरंजन केले आहे. कौन बनेगा करोडपती या शोमधून अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकांना करोडपती बनवले. केबीसीच्या याच प्रश्नाच्या रंगमंचावर छोट्या छोट्या गावातल्या स्पर्धकांची मोठी स्वप्न साकार होतात. देवीयों और सज्जनो! हे बिग बी अमिताभ बच्चन यांचे हे शब्द पुन्हा एकदा घराघरात घुमणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या या शब्दाने छोट्या पडद्यावर एकच धुमाकुळ घातला होता. आता पुन्हा तीच जादू छोट्या पडद्यावर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे आजवरचे सगळे सिझन गाजले आहेत. त्यामुळे दहावा सिझन देखील प्रेक्षकांना तितकाच आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे.
Also Read : 'पिंक'नंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार तापसी पन्नू